Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसांनी आमच्यावरच गुन्हा दाखल केला, प्रशासन कोणाची कटपुतली?; जयश्री थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 27 October 2024, 12:36

संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या संकल्प सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे बघायला मिळाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्याही मांडला होता. त्यांनतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते. आता याप्रकरणी जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जयश्री थोरात ह्या आक्रमक झालेल्या दिसून आल्या आहेत.

 

जयश्री थोरात यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं की, दोन दिवसापूर्वी जे काही झाले. ज्या पातळीवर जाऊन त्या माणसाने माझ्याबद्दल बोलले. मला न्याय देण्याच्या ऐवजी विषय भरकटवून उलट माझ्यावरच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या पाठीमागे उभे राहणाऱ्या दुर्गाताई, डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आठ ते नऊ तास रात्रभर ठिय्या मांडावा लागला. मात्र आमच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशासन कोणाची कटपुतली आहे? कोणाच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

खालच्या पातळीवर जाऊन राजकारण…

आता तुमची पुढील भूमिका काय असणार?असा प्रश्न विचारला असता जयश्री थोरात म्हणाल्या की, दिवाळी आली आहे. दिवाळी या सणात प्रत्येक जण आनंदोत्सव साजरा करतो. तुम्ही अशा प्रकारे गुन्हा दाखल करून संगमनेर तालुक्यात अशांतता पसरवत आहात. हा तालुका अत्यंत शांत आणि संयमी आहे. पण गरज पडली तर हे सर्वजण माझ्यासाठी उभे राहिले. काही लोक तेथे नसून देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिशय खोटे आणि खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची ही पद्धत योग्य नाही. त्यामुळे मी आता पोलीस स्टेशनला जाऊन सांगणार आहे की, अटक करायची तर मला करा. पण बाकीच्यांना सोडून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

हा केवळ माझा अपमान नव्हता..

आज अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरमध्ये येत आहेत. गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी ते पोलिसांना निवेदन देणार आहेत. त्यानंतर ते निषेध सभा घेणार आहेत. याबाबत विचारले असता जयश्री थोरात म्हणाल्या की, ते महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं वागणं हे त्यांना शोभणारं नाही. त्यांनी उलट माझ्याकडे येऊन माझे सांत्वन करायला पाहिजे होते. मात्र ते गाड्या फोडल्या प्रकरणी निवेदन द्यायला येत आहेत. विषय बदलण्याची गरज नाही. तुम्ही गाड्या फोडल्याचे म्हणत आहात, इथे प्रत्येक महिलांच्या अब्रूला हात घातला गेला आहे. महिला पेटून उठलेल्या आहेत. गाड्या येतात जातात, हा केवळ माझा अपमान नव्हता तर इथे असलेल्या प्रत्येक मातेचा अपमान करण्याचं काम करण्यात आले असल्याची टीका जयश्री थोरात यांनी यावेळी केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
Next Post

खेड शिवापूर टोल नाक्यावर अवैध गुटखा वाहतूक करणारे दोघे ताब्यात; राजगड पोलिसांची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.