Politics : कोट्यवधी बहिणींचा खरा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठामपणे सांगितले. सरकारने राबवलेल्या योजनांची आठवण करून देताना त्यांनी महिलांना एसटीत मोफत प्रवास, दरमहा १५०० रुपयांची मदत आणि मुलींना मोफत शिक्षण यांचा उल्लेख केला.
देशात पहिल्यांदाच अशा योजना आणणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. नगरविकास खाते शिंदे साहेबांकडे असल्याने, महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे आली तर शहराला थेट निधी मिळेल आणि पार्किंगसह अनेक प्रश्न लगेच मार्गी लागतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (politics)

नगरमध्ये विरोधक एकत्र, पण जनता हुशार
नगरमध्ये साप आणि मुंगूस एकत्र आले आहेत, अशी टीका करत पाटील म्हणाले की, नगरची जनता स्वाभिमानी आणि समजूतदार आहे. ती कोणत्याही दडपशाहीला बळी पडणार नाही.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना १५०० रुपयांची किंमत कळत नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टोला लगावला. एकनाथ शिंदेंनी मदत देताना कुठलाही धर्म पाहिला नाही. त्यामुळे या भगिनी शिवसेनेच्या धनुष्यबाणापासून दूर जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर शिवसेनेचाच होणार – संजीव भोर
शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर म्हणाले की, या शहरात दंडेलशाही करून बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न झाला. मात्र आज सभेला जमलेली मोठी गर्दी ही शिवसेनेच्या विजयाची सुरुवात आहे.
महापालिकेचा निकाल स्पष्ट दाखवून देईल की शिवसेना अजूनही मजबूत आहे आणि अहिल्यानगरचा महापौर शिवसेनेचाच होणार आहे.
सभेला मोठी उपस्थिती
या सभेला जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, स्वाती जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक संभाजी कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक उद्धव काळापहाड यांनी केले.






