maharastra politics : सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात सध्या अनेक उलथापालथी पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी दोन पक्ष एक झाले आहेत, तर काही ठिकाणी गटांचे राजकारण सुरू आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी परिस्थिती बदलत आहे आणि काही ठिकाणी दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशीच एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे. (Chandgad Nagar Panchayat Election)

राज्यातील दोन गटांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एकत्र येण्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातयं.. पण या एकत्र येण्याचं नक्की कारण काय आहे ते अजित पवार गटाते नेते हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आता ऐतिहासिक एकीचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. नंदाताई बाभुळकर (शरद पवार गट) आणि माजी आमदार राजेश पाटील (अजित पवार गट) यांनी एकत्र येऊन चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही युती खास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्त्वाखाली केली गेली आहे.
चंदगडच्या राजकारणात नवा सकारात्मक बदल
मंत्री हसन मुश्रीफ यांनी युतीच्या निर्णयावर आपला विश्वास व्यक्त केला आणि यामुळे चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवता येईल, असा विश्वास दाखवला. युतीची घोषणा करतांना त्यांनी सांगितले की, हे एक महत्त्वाचे टप्पे असून यामुळे चंदगडच्या राजकारणात नवा सकारात्मक बदल घडून येईल.
भाजपविरोधात एकमताने लढणार
युतीचा इतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपविरोधात एकमताने लढा देणे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मते, भाजपसोबत गडहिंग्लजमध्ये चर्चा सुरू आहे, तर कागलमध्ये संजय बाबा घाटगे यांच्याशीही चर्चेची अपेक्षा आहे. मात्र, मुरगूडमध्ये भाजपसोबत आघाडी करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक जनतेमध्ये उत्साह
या युतीमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होणार आहे आणि भविष्यात हे समीकरण कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या बदलांची शक्यता दर्शवते. युतीच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक जनतेमध्ये उत्साह आहे.
या सर्व घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाला नवा वळण लागण्याची चिन्हं दिसत आहेत.







