सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रुई गावात (Solapur News) वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीला पाणी देण्याच्या किरकोळ (Solapur Crime) कारणावरून झालेल्या वादाने इतके टोक गाठले की, एका बापाने आपल्या तरुण (Madha News) मुलाचा जीव घेतला. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शेतीच्या कामावरून वडील आणि मुलगा यांच्यात वाद झाला होता. या वादात मुलाने वडिलांना शिवीगाळ केल्याचा राग आरोपीच्या मनात घर करून राहिला. हा राग इतका वाढला की, रात्री घरात झोपलेल्या अवस्थेत असलेल्या मुलावर त्याने लोखंडी गजाने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कुटुंबातील वाद किती भयानक वळण घेऊ शकतो, याचे हे भीषण उदाहरण ठरले आहे. मृत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वडील राजेंद्र पतंगे यांच्याविरोधात टेभुर्णी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.







