Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ujine Dam: उजनी धरणातील बेकायदेशीर मांगुर तळी अखेर हटवणार; पण खरंच ‘कारवाई’ की फक्त इशारा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 November 2025, 8:57

सागर जगदाळे

 

भिगवण: उजनी धरण (Ujine Dam) कार्यक्षेत्रातील भीमा नदीच्या पात्रालगत बेकायदेशीरपणे मांगुर मासे पालनाचा घाणेरडा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काही परप्रांतीय व्यापारी आणि स्थानिकांनी मिळून नदीपात्राच्या काही भागावर अतिक्रमण करून कृत्रिम तळी उभारली आहेत. या तळ्यांमध्ये मांगुर माशांच्या खाद्यासाठी चिकन सेंटरमधून आणलेली कोंबड्यांची आतडी, कातडी आणि कुजलेले मांसाचे अवशेष टाकले जातात. काही दिवसांनी या कुजणाऱ्या घाणीतून तयार झालेले दूषित पाणी थेट भीमा नदीत सोडले जाते, ज्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असून पात्रातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सिंचनासाठी हेच पाणी वापरल्याने पिकांवर आणि मानवांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे.

या तळ्यांमधील मांगुर मासे छुप्या पद्धतीने बाहेर पाठवले जातात. रात्रीच्या वेळी ट्रक, पिकअप आणि खासगी फ्रिज व्हॅनद्वारे हे मासे इतर जिल्ह्यांमध्ये गुपचूप पाठवले जातात. काही ठिकाणी इतर मालाच्या आडून हे मासे पाठवले जातात, ज्यामुळे प्रशासनालाही त्याचा सुगावा लागत नाही. त्यामुळे उजनी परिसरातील हे बेकायदेशीर मांगुर पालन आता संपूर्ण प्रदेशात पसरलेला काळाबाजार बनला आहे.

ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या तरी अधिकारी बराच काळ गप्प बसले होते. अखेर जलसंपदा विभागाने या प्रकाराची दखल घेतली असून इंदापूर उपविभागीय अधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितले की, “उजनी धरण हद्दीतील बेकायदेशीर मांगुर तळी हटवण्यासाठी आदेश दिले आहेत. लवकरच अतिक्रमणावर कारवाई केली जाईल.”

मात्र लोकांच्या मनात आता प्रश्न आहे. फक्त इशारा दिला आहे कि प्रत्यक्षात काम केला जाईल ? कारण याआधीही अनेक वेळा कारवाईच्या घोषणा झाल्या, पण काही दिवसांतच “मोठ्या नेत्यांचा फोन आला आणि फाईल बंद पडली” अशी कहाणी पुन्हा ऐकू येऊ शकते. त्यामुळे या वेळी प्रशासनाचा इशारा खरंच नदी स्वच्छतेसाठी ठोस ठरणार की पुन्हा एकदा राजकीय दबावाला बळी पडणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामस्थांचे मत स्पष्ट आहे कि, “पत्रं नव्हे, कृती हवी; भिमा वाचवायची असेल तर दबाव झुगारून कारवाई करा.”

आता सगळ्यांचे लक्ष या कारवाईकडे लागले असून उजनीतील बेकायदेशीर तळी खरंच हटतील का? की पुन्हा एकदा नदी वाचवण्याचा इशारा पाण्यातच विरून जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार! मित्रानेच मित्राचा काढला काटा; कारण समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.