नागपूर: नागपूरमध्ये नातेसंबंधांनाच काळिमा (Crime News) फासणारी घटना समोर आली असून विवाहित महिलेने आपल्या 30 वर्षीय भाच्यावर छेडछाड आणि (Nagpur News) अश्लील वर्तनाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे यशोधरानगर (Vidarbha News) परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

ही घटना नागपूर येथील यशोधरा नगर परिसरात घडली. 32 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहे. तिच्या तक्रारीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी दुपारी ती घरातील बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत असताना आरोपी खोलीत उपस्थित होता. महिला बाहेर पडत असताना त्याने तिच्या मागून येत पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने तात्काळ विरोध दर्शविल्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.
घटनेनंतर काही दिवसांनी, 24 फेब्रुवारीच्या सकाळी महिला घरी एकटी असताना आरोपी पुन्हा घरात आला. तक्रारीनुसार, त्याने बेडरूममध्ये जाऊन तिचा हात धरत अश्लील वर्तन केले. महिलेने प्रसंगावधान राखत त्याला जोरात ढकलून स्वतःची सुटका केली आणि घराबाहेर आली.
घडलेला प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर तिने यशोधरा नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.





