Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अशोक खरात प्रकरणात वडेट्टीवारांचा सर्वात भयंकर आरोप; बावनकुळे म्हणाले, “पुरावे द्या अन्यथा…”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 March 2026, 14:21

Ashok Kharat Case : नागपूर : सध्या संपूर्ण राज्याचे राजकारण अशोक खरात प्रकरणामुळे चांगलेच तापले असून यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात अत्यंत खळबळजनक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. खरात याने अनेक बड्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खाजगी आयुष्याशी संबंधित बाबींचा गैरवापर केल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत खालच्या पातळीवरचे आणि राज्याची प्रतिमा मलिन करणारे आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केली. इतके गंभीर विषय समोर येत असतानाही सत्ताधारी पक्ष यावर गप्प का आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून राज्यकर्त्यांना या गोष्टीची थोडीही लाज वाटत नाही का, असेही ते म्हणाले.

 

विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच या प्रकरणात अनेक आमदार आणि आयएएस तसेच आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला होता. या सर्वांची नावे कोड वर्डमध्ये नोंदवली गेली असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारच्या कृत्यात सामील असतील तर ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा केली आहे.

दुसरीकडे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर किंवा त्यांच्या कुटुंबावर अशा प्रकारे जाहीरपणे आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा आरोपांमुळे अधिकाऱ्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसतो आणि त्यांच्या कौटुंबिक संबंधांवरही विपरीत परिणाम होतो, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय यंत्रणा आपले काम चोखपणे करत असून चौकशीमध्ये ज्यांची नावे समोर येतील त्यांना नक्कीच बोलावले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांना सल्ला दिला आहे की, जर त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे किंवा गोपनीय माहिती असेल, तर त्यांनी ती सार्वजनिकरीत्या मांडण्याऐवजी थेट मुख्यमंत्री किंवा महसूल विभागाकडे सोपवावी. पुराव्याशिवाय आरोप करून तपासात अडथळा आणू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. सध्या हे प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले असून आगामी काळात या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! एक्सप्रेसवे होणार 10 पदरी; पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात प्रवाशांचा वेळ वाचणार

Sunday, 5 April 2026, 13:55

फुरसुंगीत दारूच्या नशेत तरुणांकडून 9 वाहनांची तोडफोड

Sunday, 5 April 2026, 13:43

काळजाचा थरकाप! रस्ता ओलांडताना काळ बनून आली दुचाकी; मदतीसाठी पुढे आलेल्या चिमुकलीचा असा झाला अंत, पहा व्हिडिओ

Sunday, 5 April 2026, 13:35
Mahant Madhusudan Bharti Maharaj

Mahant Madhusudan Bharti Maharaj : अध्यात्माचा दीपस्तंभ विझला! दत्त शिखराची महती सांगणारे मधुसूदन भारती महाराज काळाच्या पडद्याआड, भक्तांमध्ये शोककळा

Sunday, 5 April 2026, 13:08

7 वर्षांची लेक शेजाऱ्याच्या बेडरूममध्ये? खिडकीतून आईने वाकून पाहिलं अन् चिमुरडीची अवस्था पाहून बसला धक्का; मोशी येथील घटना

Sunday, 5 April 2026, 12:47
baramati

baramati : बारामतीत उद्धव ठाकरेंची एन्ट्री होणार? सुनेत्रा पवारांच्या पाठिंब्याबाबत संजय राऊतांनी सगळंच स्पष्ट केलं; राहुरीचे गणितही मांडले!

Sunday, 5 April 2026, 12:37
Next Post

ब्रँडेड बाटली, दारू बनावट! पुणे-सोलापूर-साताऱ्यात पसरलंय रॅकेट; पोलिसांनी गाडी थांबवली अन् समोर आलं सत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.