Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता १ लाखाचा दंड, २ वर्षे तुरुंगवास ! राज्य सरकारने उचलले कायदेशीर पाऊल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 December 2024, 13:34

नागपूर: महाराष्ट्रातील गडकिल्ले, प्राचीन वारसास्थळी मद्यपान करणाऱ्या तसेच या वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना १ लाख रुपयांचा दंड व दोन वर्षांच्या तुरुंगवासांची तरतूद करणारे विधेयक सोमवारी विधानसभेत मांडण्यात आले.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके आणि पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष सुधारणा’ हे विधेयक विधिमंडळात सादर करण्यात आले. त्यात गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. हे सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केले.

विधेयकाविषयी माहिती देताना ते म्हणाले, गडकिल्ल्यांवर दारू पिणे, तेथील पुरातन वास्तूंचे नुकसान करणे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. त्यास आंतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची तरतूद नव्हती. आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल. याआधी असा गुन्हा करणाऱ्यांना १ वर्ष कारावास आणि १० हजार रुपये दंडांची शिक्षा होती.

बेकायदा वृक्षतोडीसाठी ५० हजारांचा दंड

बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक सोमवारी विधानसभेत सादर करण्यात आले. हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ते सुधारणेसह मांडण्यात आले आहे. बेकायदा वृक्षतोडीसंदर्भात १९६७ च्या कायद्यानुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. त्यात नंतरच्या काळात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. १९६७ च्या एक हजार रुपयांचे आजचे मूल्य ५० पट वाढले असल्याने यापुढे बेकायदा वृक्षतोडीला पन्नास हजार रुपये दंड आकारला जाईल.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यात हुडहुडी, पारा आणखी घसरणार! धुळे १०.४ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढण्याचे संकेत

Monday, 16 November 2026, 8:25

नोव्हेंबरच्या मध्यात हवामानाचा नवा बदल! सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; पुढील काही दिवस कसे असणार वातावरण? वाचा

Monday, 16 November 2026, 8:00

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44
Next Post
Sanjay kute writes letter to followers after not getting ministry birth

जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवास्थानाकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना आमदार संजय कुटे यांचे पत्र; केलं हे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp