Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; पुण्यात ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 January 2023, 12:00

पुणे : महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, तसेच महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य राखीव पोलीस बल क्र.2 मैदान वानवडी येथे आयोजित ३३व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, मेघना बोर्डीकर साकोरे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस महासंचालक तथा गृह रक्षक दलाचे महासमादेशक भूषणकुमार उपाध्याय, प्रशिक्षण विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंग, पुणे शहरचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद आदी उपस्थित होते.

यापुढे बोलताना फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यासह लोकशाहीची मूल्ये जपण्याकरिता पोलीस दल कार्यरत आहे. विपरीत परिस्थितीत पोलीस कर्मचारी काम करतात. पोलिसांनी कोरोना काळात जीवनाची जोखीम पत्करून प्रचंड काम केले. त्यादरम्यान काही पोलिसांना शहीद व्हावे लागले. अशाही परिस्थितीत सामान्य माणसाचे जीवन सुकर व्हावे यासाठी पोलीस दलाने काम केले.

पोलीस विभागाकडून अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल. बालेवाडी येथे खेळासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. पण पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यादृष्टीने पायाभूत सुविधांची याठिकाणी व्यवस्था करण्यात येईल.

पोलीस महासंचालक सेठ म्हणाले, “या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या उत्साहात पार पडल्या. पोलीस खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, संघभावना वाढावी, आरोग्य तंदुरुस्त राहावे, मनोबल वाढावे यासाठी या स्पर्धा उपयुक्त आहेत. या स्पर्धेत ६ नवीन विक्रम नोंदले गेले. पुणे येथे २८ एकर जागेत पोलीस क्रीडा संकुल आणि होस्टेल बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे.” यावेळी राज्य राखीव पोलीस बल, प्रशिक्षण केंद्र नानविज येथील प्रशिक्षणार्थीनी नाईट सायलंट आर्म ड्रील या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

फडणवीस यांच्या उपस्थितीत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजयी खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. महिला गटात मंजिरी रेवाळे यांनी सुवर्णपदक, प्रियांका फाळके रौप्यपदक आणि नाजुका भोर यांनी कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात पप्पू तोडकर यांनी सुवर्णपदक, बाबासाहेब मंडलिक यांनी रौप्यपदक आणि मल्लिकार्जुन बिराजदार यांनी कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

दरम्यान, प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वाधिक क्रीडा प्रकारात विजेतेपद मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सर्वांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. प्रास्ताविक अनुप कुमार सिंग यांनी केले. आभार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीतील पेट्रोल पंपावर झोपलेल्या ट्रकचालकांचे दोन महागडे मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला

Thursday, 29 October 2026, 15:41

लोणी स्टेशन चौकात धोकादायक पद्धतीने वाहन उभे; चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 29 October 2026, 15:28

BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनस जाहीर; किती रुपये मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

Thursday, 29 October 2026, 15:16

पुण्यातील विचित्र प्रकार! ‘दादा मला भूक लागलीय, खायला दे” म्हणत डायरेक्ट तरुणाचा खिशात हात घातला अन् विरोध करताच लोखंडी रॉडने हल्ला…

Thursday, 29 October 2026, 14:58

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचा धुरळा! 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांसाठी रणशिंग फुंकणार?

Thursday, 29 October 2026, 14:53

लंडनहून पुण्यात आली अन् घरात संशयास्पदरित्या आढळला मृतदेह! फोन बंद, बँक खात्यावरून पैसेही गायब; तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 14:53
Next Post

पुण्यात आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरार रंगणार ; यावर्षी कोण किताब पटकाविणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp