Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : आईसोबत क्लासला निघालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढत अत्याचार; लोणी काळभोर पोलिसांनी एका तासाच्या आत आवळल्या आरोपीच्या मुसक्या

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 6 January 2025, 13:27
FIR registered against man molesting woman and girl baramati Pune

लोणी काळभोर : क्लासवरून घरी चाललेल्या एका दहावीच्या विद्यार्थिनीची छेड काढून विनयभंगासह अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर परिसरात रविवारी (ता.5) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

युवराज सोमनाथ सोनवणे (वय 25 रा.धुमाळ मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय पिडीतेच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर या अगोदरही आरोपीच्या विरोधात भरतीय न्याय दंड संहिता कलम 363 अन्वये गुन्हा दाखल आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विद्यार्थिनी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तसेच ती लोणी काळभोर परिसरात एका खाजगी क्लास मध्ये शिकवणीसाठी जाते. दरम्यान, पिडीता ही नेहमीप्रमाणे रविवारी क्लासला निघाली होती. त्यावेळी पिडीतेसोबत तिची आईदेखील होती. पिडीता ही लोणी काळभोर गावातील कृष्णा मॅचिंग साडीच्या दुकानाजवळ आली असता, आरोपी युवराज सोनवणे हा तिथे आला.

त्यानंतर आरोपीने पिडीतेला हटकले. ‘माझ्याशी बोल, आपण पळून जाऊ’ असे म्हणत पिडीतेशी लगट करू लागला. तसेच पिडीतेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी पिडीतेच्या आईस हाताने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतेच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले व आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार व विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अवघ्या एक तासाच्या आत मोठ्या शिताफीने अटक केली.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, चक्रधर शिरगिरे व योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सासवड-जेजुरी रस्त्यावर अज्ञात कारच्या धडकेत खळद येथील व्यक्तीचा मृत्यू; धडक देऊन कार चालक फरार

Sunday, 12 April 2026, 17:21
Yawat

Yawat : यवत-राहू मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा (आरओबी) मार्ग मोकळा

Sunday, 12 April 2026, 17:19
Onion Rate

Onion Rate : इराण-इस्रायल तणावाचा फटका थेट महाराष्ट्राच्या कांद्याला! निर्यात थंडावली, साठा वाढला; दरात मोठी घसरण

Sunday, 12 April 2026, 16:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात ‘ही’ जुनी परंपरा कायमची बंद

Sunday, 12 April 2026, 16:43

समर्थ क्रॉप केअरचा महाघोटाळा! पुणे शहरानंतर आता आरोपी प्रशांत गवळीचा ताबा अहिल्यानगर पोलिसांकडे, साथीदार अजूनही मोकाट?

Sunday, 12 April 2026, 16:29

“तुझा मुलगा वाटत नाही! नक्की तुझाच आहे ना!” संशयाचं भूत अंगात संचारलं अन् जन्मदात्यानेच 6 वर्षांच्या चिमुरड्याला संपवलं

Sunday, 12 April 2026, 16:25
Next Post

ओ यो मध्ये अविवाहित जोडप्यांना प्रवेश बंदी! ‘या’ शहरामध्ये नवा नियम लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.