Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat : खासगी शाळांच्या अवाढव्य शुल्कावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायदा करणार; आमदार राहुल कुल यांच्या प्रश्नाला शालेय शिक्षण मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 27 February 2026, 18:44
Yawat

photo- ppn

Yawat : राज्यातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून घेतल्या जाणाऱ्या अवाढव्य शुल्कावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार एक सर्वसमावेशक धोरण आणि कायदा तयार करण्याच्या विचारात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती सरकारने आज विधानसभेत दिली. दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही ग्वाही दिली.
विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात आमदार राहुल कुल यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाच्या त्रुटींकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आमदार राहुल कुल यांनी प्रामुख्याने तीन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले: पूर्वी ‘सर्व शिक्षा अभियान’च्या माध्यमातून केंद्र सरकार शाळांच्या इमारतींसाठी निधी देत असे, मात्र सध्या राज्यातील अनेक शाळांची, विशेषतः जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अशा शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार कुल यांनी केली.
अनेक खासगी शाळा पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारत आहेत, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शुल्काची ‘कमाल मर्यादा’ निश्चित करणार का आणि नियम मोडणाऱ्या शाळांवर कारवाई होणार का? असा थेट प्रश्न आमदार राहुल कुल यांनी विचारला. यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, शालेय शुल्काच्या संदर्भात राज्य सरकार एक अभ्यासपूर्ण धोरण तयार करत असून, येणाऱ्या काळात या फीवर मर्यादा आणणारा कायदा केला जाईल.
सरकारने ज्या शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित केल्या आहेत, तेथील गुणवंत शिक्षकांना तेथेच कायम ठेवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांची असते. मात्र, सध्याच्या बदलीच्या नियमांमुळे अशा शिक्षकांची बदली होते, ज्याचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होतो. अशा परिस्थितीत अपवादात्मक अधिकार वापरून मंत्र्यांनी या बदल्या थांबवाव्यात, अशी मागणी कुल यांनी लावून धरली.
या प्रश्नांवर उत्तर देताना सरकारने शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणे, शुल्क नियंत्रणासाठी कायदा करणे आणि शिक्षकांच्या बदल्यांबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.
आमदार राहुल कुल यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे राज्यातील लाखो पालकांना आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01
Next Post
Lonikalbhor

Lonikalbhor : लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.