Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतमोजणीला विरोध करण्यासाठी महिलांनी अंगावर ओतून घेतले डिझेल; बुरुंजवाडील येथील धक्कादायक प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 29 August 2024, 23:21

अक्षय टेमगिरे

 

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील बुरुंजवाडी गावच्या हद्दीत शिक्रापूर व बुरुंजवाडी गावच्या सिमेवर सुरु असलेल्या जमीन मोजणीला विरोध करत महिलांनी चक्क अंगवर डिझेल ओतून घेत पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक पुरुष, दोन महिलांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.

महिला पोलीस शिपाई रुपाली बाळासाहेब निंभोरे (वय-२८ वर्षे रा. शिक्रापूर, ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अमोल बाळासाहेब वाबळे (वय-२९ वर्षे रा. वाबळेवाडी, शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे), सुरेखा बापूसाहेब पुंडे (वय-३४ वर्षे रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे), सुजाता अर्जुन खैरे (वय-३६ वर्षे रा. खैरेनगर, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरुंजवाडी (ता. शिरुर) गावच्या हद्दीमध्ये शिक्रापूर व बुरुंजवाडी गावच्या सिमेवर असलेल्या जमिनीची पोलीस संरक्षणात मोजणी करण्यात येत होती. त्यावेळी पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार गणेश करपे, विकास सरोदे, हनुमंत गिरमकर, प्रतिक जगताप, अंकुश चौधरी, योगेश आव्हाड, महिला पोलीस हवालदार किरण निकम, रुपाली निंभोरे हे उपस्थित होते.

यावेळी भूमापक अधिकारी एस. बी. पाटील हे जमिनीची मोजणी करत असताना अमोल वाबळे, सुरेखा पुंडे, सुजाता खैरे यांसह काही महिला व इसम सदर ठिकाणी त्यांनी येथील जमीन मोजणीला विरोध करत चक्क अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी महिलेच्या हातामध्ये असलेली काडीपेटी ओढून घेण्यासाठी पोलीस कर्मचारी गेलेले असताना एका पोलिसाच्या अंगावर डिझेल पडून पोलीस कर्मचारी डिझेलने ओलाचिंब झाला, तर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ जखम झाली. मात्र यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. महिला पोलिसांनी फिर्याद दिल्याने एका पुरुष व दोन महिलांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
Next Post

सांधेरोपण: एक सोप्या भाषेत समजून घेण्यासारखा मार्गदर्शक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.