पुणे : सध्या राज्याचं राजकारण बारामती लोकसभा भोवती फिरत आहे. त्यामुळे सर्वांच लक्ष बारामतीकडे लागलं आहे. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यांत लढत होण्याच दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोणते आमदार आणि कार्यकर्ते कोणाला साथ देणार? याची चर्चा सुरु असतानाच सुनेत्रा पवारांनी भोर वेल्हाचे आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे वडिल अनंतराव थोपटेंची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच चर्चां रंगल्या आहेत.