Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये इंधनचोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; 6 जणांना अटक, तर 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 11 September 2024, 14:31
six people arrested for stealing fuel from tankers in loni kalbhor Pune

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात गेल्या 15 वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख प्रविण मडीखांबेसह त्याच्या 7 साथीदारांना जून महिन्यात तडीपार करण्यात आले होते. त्यामुळे इंधन चोरीला आता तरी आळा बसेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, त्याच्याच मार्गदर्शनाखाली इंधन माफिया लोणी काळभोर परिसरात पुन्हा सक्रीय असल्याचे उघडकीस आले आहे. हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या आदेशान्वये लोणी काळभोर व मुंढवा पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा परिसरात मंगळवारी (ता.10) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकून इंधनचोरीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. तर 3 टँकर, 2 आयशर, 1 कार अशी सहा वाहने व 1800 लिटर इंधन असा 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

शुभम सुशील भगत (वय 23, धंदा ड्रायव्हर, रा. बोरकरवस्ती. थेऊरफाटा, ता. हवेली जि. पुणे), तृशांत राजेंद्र सुंभे (वय 31 धंदा शेती रा. बँक ऑफ बडोदाजवळ, थेऊरफाटा ता. हवेली जि. पुणे), रवी केवट (वय 25, धंदा मजुरी रा. बोरकरवस्ती, माळीमळा ता. हवेली जि. पुणे), विशाल सुरेश गोसावी (वय 30, रा वाणीमळा थेजुर फाटा ता. हवेली जि. पुणे), किरण हरिभाऊ आंबेकर (वय 31, धंदा ड्रायव्हर रा. कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) व रोहीत कुमार (वय-21, मजुरी रा. बोरकरवस्ती माळीमळा ता. हवेली जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या इंधनमाफियांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार मल्हारी शिवाजी ढमढेरे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या आदेशान्वये लोणी काळभोर व मुंढवा पोलिस हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मंगळवारी (ता. 10) गस्त घालत होते. गस्त घालत असताना, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कंपनीमध्ये पेट्रोल व डिझेल भरून टँकर पेट्रोल पंपाकडे जात असतात.

दरम्यान, कंपनीकडून टँकर प्रवास करण्याचा मार्ग, वेळ नियोजित केलेली असते. तसेच सदर टँकर कंपनीच्या बाहेर गेल्यानंतर इंधन काढता येवू नये, याकरीता टँकरला कंपनीतच लॉक करुन पाठविले जाते. असे असताना देखील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाट्याजवळ असलेल्या तुकाराम धुमाळ यांच्या घराच्या पाठीमागे, रिकाम्या जागेत पत्र्याच्या शेडजवळ टँकर नेऊन त्यातील पेट्रोल-डिझेलची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला.

तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी शेडजवळ असलेल्या रिकाम्या जागेत एकुण तीन टँकर उभे असल्याचे दिसून आले. त्यापैकी एक हिंदुस्थान पेट्रोलियम व दुसरा इंडियन ऑईल कंपनीचा, तर तिसऱ्या टँकरवर कंपनीचे नाव नव्हते. थोड्या वेळाने त्याठिकाणी धुमाळ मळ्याकडून एक झेन कंपनीची चारचाकी गाडी टँकरजवळ आली. त्या गाडीतून एक इसम खाली उतरला. त्याने पाईप जोडलेली एक इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढली. त्याला आडोसा करण्यासाठी दोन मोठे आयशर ट्रक पेट्रोल काढताना दिसणार नाही, अशा स्थितीत आणून उभे केले. सदर इसम टँकरमधून इलेक्ट्रिक मोटार व पाईपव्दारे डिझेल चोरी करुन एका प्लास्टिकच्या बॅरलमध्ये काढताना आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी या छाप्यात 1620 लीटर डिझेल (अंदाजे 1 लाख 45 हजार), 3 टँकर (प्रत्येकी 10 लाख प्रमाणे), 2 आयशर (प्रत्येकी 8 लाख रुपये प्रमाणे), 50 हजार रुपये किंमतीची 1 कार व साहित्य असा 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी डिझेल या सरकारी मालाचा अपहार व चोरी केली आहे. आरोपींनी डिझेल या अत्यावश्यक व ज्वलनशील पदार्थाचा हयगयीने साठा करुन ते डिझेल लोकांना काळ्या बाजाराने विक्री केले आहे. त्यामुळे आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियम व विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी वरील सहाही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी इंधन चोरी करत असून ते गावातील लोकांना विकून पैसे कमावतात. तसेच सदर पेट्रोल चोरीचा अड्डा श्रीकांत ऊर्फ सोन्या राजेंद्र सुबे यांच्या मालकीचा असल्याचे सांगून प्रविण सिद्राम मडीखांबे (रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) आणि त्याचे इतर साथीदार पेट्रोल चोरीमध्ये मार्गदर्शन व मदत करत आहे. सदर पेट्रोलचे टँकर इंधन माफिया प्रविण मडीखांबे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने विक्री करुन त्याचा मोबदला आपआपसात वाटुन घेत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

ही कामगिरी हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, मुंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, लोणी काळभोर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार रामहरी वणवे, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, बाजीराव विर, योगेश पाटील व मल्हारी ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : शेतात महिलेचं ब्लाऊज आणि जळालेले फोटो; ‘त्या’ भयंकर प्रकारामुळे अख्खं गाव भीतीच्या छायेत! ‘त्या’ घटनेने खळबळ

Monday, 13 April 2026, 23:27
IPL 2026

IPL 2026 : आईने दागिने विकले, फाटलेल्या बुटात सामने खेळले; आता आयपीएल गाजवतोय बिहारचा साकिब! प्रेरणादायी प्रवास

Monday, 13 April 2026, 23:07
Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Next Post

मलायकाच्या वडिलांची ती आत्महत्या नव्हेच; मुंबई पोलिसांची मोठी माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.