Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : नगर कल्याण महामार्गावर आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन..

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 1 October 2023, 19:40

शुभम वाकचौरे
जांबूत, (पुणे) : राज्य शासन एस.टी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सवलती धनगर समाजाला देणार असे त्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिल्याने आदिवासी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या निर्णयाच्या विरोधात अधिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे.
जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील बनकरफाटा येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली समाजाने शनिवारी (ता. ३०) चक्का जाम करून नगर कल्याण महामार्ग अडवून आंदोलन केले होते.

सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध करून आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं…अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या आरक्षणाला हाथ लावला तर हाथ कलम केले जातील. असा इशाराही आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला.

आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचाही समावेश करू नये. त्यांना त्यांचे आरक्षण वेगळ्या पद्धतीने द्यावे. यासाठी आदिवासी समाजाने हाती दंडुका घेऊन रास्तारोको आंदोलन केले. यावेळी समाजातील विविध पक्षातील नेते आदिवासी बांधवांसाठी राजकारण बाजूला ठेवू. आम्ही आमच्या समाजासाठी सदैव एकत्रच असणार आहे.

 

आंदोलनामुळे तिन्ही बाजूच्या मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन कर्त्यांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. हे आंदोलन सुरळीत पार पाडण्यासाठी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीसनिरीक्षक सचिन कांडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, भीमा मुठे, विनोद केदारी, गेनू उंडे, दत्ता गवारी, पंडित मेमाणे, मारुती वायळ, काळू शेळकंदे, मंगल उंडे, सुनीता बोराडे, संजय कुदळ, राजु मुठे, विजय डामसे, देवराम मुंढे, विक्रम मुंढे, धोंडू मराडे, राजू कारभळ, शंकर घोडे, अमोल लांडे, कैलास गारे, सुरेश घोडे, गोविंद साबळे, शंकर माळी, विठ्ठल कवटे, ठमा कवटे, काळू माळी, सोनाबाई दाभाडे, हौसाबाई काठे, योगिता दाभाडे अनेक आदिवासी महिला व तरुणमोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे म्हणाले, “धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असे आम्ही म्हणत नाही. परंतु आमच्या आरक्षणात त्यांना सहभागी करून घेऊ नये यावर आम्ही ठाम आहोत. प्रत्येक वेळी आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे. वेळ पडली तर विधानभवनावर आदिवासी मोर्चा घेऊन जाणार, यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडणार असून जुन्नर तालुक्यात शरद पवार येणार आहेत. त्यांच्याकडे देखील आम्ही निवेदन देणार आहोत. माझ्या समाजासाठी प्राण गेले तरी बेहत्तर परंतु मी मागे हटणार नाही. यावेळी फक्त नगर-कल्याण महामार्ग थोड्यावेळापुरता बंद केला, परंतु भविष्यात सरकारने आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष नाही दिले. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईला जाणाऱ्या माळशेज, कसारा, खंडाळा या घाटांमध्ये चक्काजाम आंदोलन करून महामार्ग बंद करण्यात येईल.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Uruli Kanchan News : 'एक तारीख, एक तास' उपक्रमात उरूळी कांचनच्या ग्रामस्थांचे श्रमदान ; सीईओ रमेश चव्हाण यांनी नोंदवला सहभाग..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.