रांजणगाव गणपती: कारेगाव, ता.शिरुर येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक संभाजी भागुजी तळेकर (वय ६४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, पत्नी, मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

तळेकर यांनी पोलिस खात्यात ४० वर्षे पोलिस शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक या पदावर काम केले. व्यावसायिक सुहास तळेकर हे त्यांचे पुत्र तर येथील माजी उपसरपंच शहाजी तळेकर हे त्यांचे पुतणे होत.







