Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो लक्ष द्या! पीओपीच्या मूर्ती तयार करण्यास बंदी, महापालिकेने जाहीर केली नियमावली..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 14 February 2025, 11:05

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. शहरात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवासह विविध सण, उत्सवात यंदाच्या वर्षापासून आता ‘पीओपी’च्या मूर्ती तयार करता येणार नाहीत. उच्च न्यायालयाने याबाबत आदेश दिले आहेत.या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी दिले आहेत.

 

‘पीओपी’च्या मूर्तीचा वापर करण्यास राज्य सरकारकडून यापूर्वीच बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही प्रमाणात उत्सवाच्या काळात मूर्तिकारांकडून मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. यंदाच्या वर्षी मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने त्याची सुधारित नियमावली प्रसिद्ध केली आहे.

त्यामुळे आता पुढील काळात शहरात ‘पीओपी’च्या मूर्ती बनविण्यास आणि त्या पाण्यात विसर्जित करण्यावर बंदी असणार आहे. ‘पीओपी’च्या वापराबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवरील ३० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीमध्ये विविध सण-उत्सावांदरम्यान सर्व महापालिका, सर्व जिल्हाधिकारी यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांतील कलम २ नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णतः बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते.

निर्देशाचे पालन न झाल्यास कारवाई

या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये, संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे

  • मूर्ती या नैसर्गिक, पर्यावरणपूरक घटकांपासून कराव्यात.
  • मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात तसेच मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक.
  • रासायनिक रंग, ऑइल पेंट्स, वापरण्यास बंदी.
  • मूर्तीचे रंग जैव विघटनशील आणि बिनविषारी, नैसर्गिक असावेत मूर्तींचे दागिने बनविताना वाळलेल्या फुलांच्या घटकांचा वापर करावा.
  • अन्नदानासाठी एक वेळ वापराचे प्लास्टिक प्लेट, प्लास्टिक साहित्य वापरू नये.
  • पूजेसाठी फुले, वस्त्र, पूजा साहित्य पर्यावरणपूरक असावे
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Next Post

जीबीएस’च्या थैमनानंतर सरकारचे डोळे उघडले: पिण्याच्या शुद्ध पाण्याबाबत घेतला मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.