Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : टोमॅटोची लाली उतरली; बाजारभाव घसरल्याने तोडणीही परवडेना; निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकऱ्याची परवड

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Tuesday, 12 September 2023, 11:52

योगेश पडवळ

Pune News : पाबळ : टोमॅटो पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्राधान्याने टोमॅटोचे उत्पादन घेतले. मात्र, टोमॅटोचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांना आता टोमॅटोची तोडणी तसेच वाहतूक देखील परवडत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कधी मान्सूनची हुलकावणी, कधी अतिवृष्टीचा फटका तर कधी दुष्काळ अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे.

शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ…

यंदा ऑगस्ट महिन्यात मान्सूनने चांगलीच ओढ दिली. निसर्गाच्या या चक्रातून बाहेर पडल्यावर आता शेतमालाचे दर कोसळल्याची चिंता बळीराजाला भेडसावत आहे. कांदा आणि टोमॅटो पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत आहे. महिनभरापूर्वी भाव खाल्लेला टोमॅटो आता शेतकऱ्यांना रडवत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि जुन्नरमध्ये टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

 

दरम्यान, मागील महिन्यात आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे दर तेजीत होते. टोमॅटोला विक्रमी भाव मिळाला होता. सुमारे ३ हजार ते अडीच हजार रुपये प्रती क्रेट दराने टोमॅटो विकला गेला होता. यामुळे केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे अवघ्या महिनाभरातच टोमॅटोसह भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली. आता टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सविंदणे (ता. शिरूर) येथील शेतकरी नाथा लंघे यांच्यावर टोमॅटोची बाग सोडून देण्याची वेळ आली. ३ हजार रुपये दर असलेल्या टोमॅटोचा क्रेट आता ७० रुपये प्रती कॅरेट विकला जात आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने त्वरित टोमॅटोची आयात केली अन् भावातील घसरण थांबवली. आता टोमॅटोला भाव नसतानाही सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॉमेटोला पुन्हा मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहे. नारायणगाव बाजार समितीमध्ये सरकारचा निषेध व्यक्त केला गेला. भाव पडल्यामुळे हातात टोमॅटो घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या. गेल्या दीड महिन्यांच्या तुलनेत आता फळभाज्यांचे दर कमी झाले आहेत.

प्रक्रिया उद्योगाची गरज…
केंद्र सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र कृषी कौशल्य व विकास कार्यक्रम हाती घेतला होता. त्यातून शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन मिळणार होते. शिरूर व जुन्नर तालुक्यात विकणारा टोमॅटो हा उत्तम दर्जाचा आहे. परंतु मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे कमी वेळात शक्य होत नाही. त्यातून बाजारभावामुळे परवडत देखील नाही. शिरूर व जुन्नर तालुक्यात भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाल्यास शेतकऱ्यांचा भाजीपाल प्रक्रिया करून ठेवता येईल.

सरकारने शेतकऱ्यांना धरले वेठीस…
कवठे येमाई येथील राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेश सांडभोर म्हणाले की, मागील हंगामात टोमॅटोचे दर कमी झाले होते. त्या काळात टोमॅटो शेताच्या बांधावर फेकून दिले. त्यानंतर टोमॅटोचे दर वाढले. यामुळे पुन्हा भांडवल गोळा करून टोमॅटोची लागवड केली. आता कष्ट करून टोमॅटो उत्तम पिकवला आहे. मात्र, पुन्हा टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतीचे भांडवल नष्ट होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरले असून, टोमॅटो मातीमोल ठरत आहे.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune News : नामांकित कंपन्यांचे कपडे म्हणून खोक्यातून पाठवल्या चिंध्या; चंदननगरमधील महिलेची ३ लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.