Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Local Bodies Election: बारामतीत पवारा-पवारांमध्ये थेट ‘गृहयुद्ध’! संपूर्ण पुणे जिल्ह्यात महायुतीला मोठा धोका! वाचा, निवडणूक निकालाआधीचा सगळा सस्पेन्स…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 November 2025, 16:14
Pune Local Bodies Election: Direct 'civil war' between Pawar and Pawar in Baramati! Big threat to the Mahayuti in the entire Pune district! Read, all the suspense before the election results...

Photo-Social Media

पुणे: जिल्ह्यातील एकूण 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या (Pune Local Bodies Election) निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल (Pune Election) करण्याच्या शेवटच्या (Pune News) दिवशी सर्वच ठिकाणी (Pune Politics) मोठी गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी महायुतीत मतभेद, तर महाआघाडीतही बिघाडी झाल्याचं चित्र दिसलं. अर्जांची छाननी आज होणार आहे आणि अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणचे प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Latest Breaking News)

 

बारामती नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही गटांनी आपापले उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. भाजपने रासपची साथ घेतली असून, शिवसेना (शिंदे) गटानेही उमेदवार दिल्याने अजित पवारांच्या गटाला महायुतीतीलच स्पर्धा अधिक कठीण होणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना उमेदवारी दिली असून, भाजपकडून ॲड. गोविंद देवकाते हे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून तीन अर्ज दाखल झाले असून, अंतिम उमेदवार माघार प्रक्रियेनंतर घोषित केला जाणार आहे.

जेजुरी नगरपरिषदेत माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाला सर्व प्रभागांत उमेदवार मिळाले आहेत. येथे नगराध्यक्ष पदासाठी दोन आणि नगरसेवक पदासाठी 42 अर्ज दाखल झाले असून, गेल्या पाच वर्षांच्या नगराध्यक्ष वीणा सोनावणे यांच्या परिवारातील सदस्यही स्पर्धेत आहेत.

दौंडमधील निवडणूक तिरंगी होत असून, नागरिक संरक्षण मंडळ, भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पॅनल रिंगणात आहेत. ही निवडणूक स्थानिक राजकारणातील भविष्यातील समीकरणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाविरोधात बंड पुकारत हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या सोबत पर्याय तयार केला आहे. येथे भरत शहा आणि गारटकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

राजगुरूनगरमध्ये महायुती झाली असली तरी महाविकास आघाडीत फूट पडली आहे. भाजपने 13 जागांवर उमेदवार दिले असून, नगराध्यक्ष पदासाठी 11 दावेदार आहेत.

शिरूर, मंचर, जुन्नर, भोर आणि सासवड येथेही आघाड्या आणि युती न साधल्याने बहुकोनी लढती अपेक्षित आहेत. अनेक ठिकाणी महायुत्तीतीलच मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत, तर काही प्रभागात मैत्रीपूर्ण लढती दिसत आहेत.

चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र विशेष चित्र दिसले. दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र येत दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, सदस्य पदांवर दोन्ही गटांचे स्वतंत्र उमेदवार असल्याने पूर्ण युती नसून केवळ नगराध्यक्ष पदापुरता पाठिंबा दिल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने यंदाची स्थानिक निवडणूक अत्यंत चुरशीची आणि राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Karnataka Crime News: "लग्नाला इतके महिने...माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत नसेल तर मीच...; सासऱ्याकडून सुनेला भयंकर... नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.