लोणी काळभोर: रुग्णवाहिका आपत्कालीन (Pune News) परिस्थितीत रुग्णाला त्वरित वैद्यकीय सेवा देऊन सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवते. रुग्णवाहिका रुग्णांना जलद आणि सुरक्षितपणे नेते. त्यामुळे गंभीर आजारी किंवा अपघातात जखमी झालेल्या रुग्णाचा दवाखान्यात वेळेवर उपचार मिळतात. व रुग्णाचा जीव वाचतो. परंतु, ग्रामीण भागात रुग्णवाहिकांचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांची गैरसोय झाली आहे. ही गरज ओळखून नागरिकांच्या सेवेसाठी पूर्व हवेलीत उद्यासापासून केशर रुग्णवाहिका दाखल होणार आहे. (Latest Marathi News)

कै. केशरबाई गोवर्धन दांडगे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि समाजसेवेचा वारसा जपण्यासाठी ‘केशर ॲम्बुलन्स’ सुरु करण्यात येत आहे. या सेवेचे उद्घाटन साधना सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुभाष काळभोर व एसजीए ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ शंकर गायकवाड यांच्याहस्ते कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथे उद्या शनिवारी (ता.10) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास होणार आहे.
उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, थेऊरसह परिसरातील रुग्णांना केशर रुग्णवाहिकेचा मोठा फायदा होणार आहे. या रुग्णवाहिकेत मेडीट्रान्स सर्व्हिसेस सेवा देण्यात येणार आहे. नागरिकांनी केशर रुग्णवाहिकेशी 97657 19007 / 9923408000 या फोन नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन केशर रुग्णवाहिकेचे संचालक जनार्दन दांडगे, लक्ष्मण दांडगे, वैजनाथ कदम व वैभव कदम यांनी केले आहे.
रुग्णवाहिका ठरणार वरदान
लोणी काळभोर ते उरुळी कांचन दरम्यान दररोज छोटे मोठे अपघातात होत असतात. अपघातात जखमी रुग्णाला वैद्यकीय मदत लवकर भेटली नाही तर त्याच्या जीव धोक्यात येऊ शकतो. तसेच इतर आजारांमध्ये रुग्णाला वेळेवर उपचार भेटले नाहीत तर त्याच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे पूर्व हवेलीतील रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी केशर रुग्णवाहिका ही वरदान ठरणार असून या सुविधेमुळे भविष्यात अनेक रुग्णाचे प्राण वाचणार आहेत.








