Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे मनपा निवडणुकीसाठी आयुक्त नवल किशोर राम यांची पोलीस विभागासोबत समन्वय बैठक..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 December 2025, 9:54

प्रतिनिधी अमित मुंडीक

 

पुणे: पुणे (Pune News) महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या अनुषंगाने पोलीस विभागाशी समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली.

या बैठकीस रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, संदीप भाजीभाकरे, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा), अर्चना गायकवाड, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी, तसेच विविध संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत निवडणूक कार्यक्रम कालावधीची माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस विभागाशी संबंधित विविध कक्ष स्थापन करणे, तसेच त्या कक्षांमध्ये समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक, भरारी पथक, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, झोनल अधिकारी, निवडणूक निरीक्षक, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम, साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र, मतमोजणी केंद्र, एक खिडकी योजना, ईव्हीएम वाहतुकीसाठी सुरक्षा व्यवस्था तसेच संवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती यासंदर्भातील कार्यवाही पोलीस विभागामार्फत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तसेच उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा, तात्पुरती प्रचार कार्यालये, ध्वनिक्षेपक परवाने, मिरवणूक/रोड शो, तसेच प्रसारमाध्यमांतील जाहिरातींचे पूर्व प्रमाणन इत्यादी कामे पोलीस विभागाकडून करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पुणे महानगरपालिकेस निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असे सांगितले.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक 2025-26 संदर्भातील प्राथमिक माहिती सादर करण्यात आली. उप आयुक्त तथा नोडल अधिकारी (थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र) यांनी थकबाकी ना हरकत प्रमाणपत्रासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीची माहिती दिली.

या ऑनलाइन प्रणालीमुळे नाव नोंदणी व अर्ज प्रक्रिया सुलभ आणि सोपी झाल्याचे नमूद करत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पुणे मनपाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत केले.

बैठकीदरम्यान शपथपत्राचा नमुना, थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, नाव दुरुस्ती आदी विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सर्व प्रश्नांचे निराकरण अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) तथा निवडणूक अधिकारी आणि इतर मनपा अधिकाऱ्यांनी केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56
Next Post

Pune News: कर्वे पुतळा चौकात अपघात; भरधाव कार दुभाजकाला धडकली; चालकाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.