Saturday, March 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manchar Election: मंचरमध्ये मोठा राजकीय भूकंप, दिलीप वळसे पाटील आणि आढळरावांना धक्का; राजश्री गांजळे यांचा धनुष्यबाणाचा अचूक वेध

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 December 2025, 15:58

Manchar Election: मंचर (पुणे) : मंचर नगर परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा येथे झाली होती आणि त्याचा शिवसेनेला काही प्रमाणात फायदा झाल्याचे निकालातून दिसून आले. शिवसेनेच्या उमेदवार राजश्री दत्ता गांजाळे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. मात्र, शिवसेनेला नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवता आलेले नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. Manchar Election

हेही वाचा- थर्टी फर्स्टची पार्टी यंदा कोरडीच? दारूचा बेत फसला; पुण्यात लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त

या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अनेक उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेच्या राजश्री गांजाळे यांना 4135 मते मिळाली. त्यांच्या निकटवर्तीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका सुनील बाणखेले यांना 3925 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांनी 3224 मते मिळवत शेवटपर्यंत जोरदार लढत दिली. प्राची थोरात यांना मिळालेली मते लक्षवेधी ठरली असून त्यांनी प्रमुख पक्षांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे.

याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आघाडीच्या उमेदवार रजनीगंधा राजाराम बाणखेले यांना 738 मते मिळाली. काँग्रेसच्या फार्जीन इकबाल मुलाणी यांना 333 मते तर अपक्ष उमेदवार जागृती किरण महाजन यांना 301 मते मिळाली. दरम्यान, नगराध्यक्षपदी विजय मिळवूनही राजश्री गांजाळे यांचे पती दत्ता गांजाळे यांचा पराभव झाला असून त्यांना 135 मते मिळाली.

नगरसेवकांच्या निकालांकडे पाहता, एकूण 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेनेचे 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा 1 तर 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या जास्त असली तरी नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेले आहे.

प्रचारानंतरही नगराध्यक्षपद निसटले

माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे तसेच भाजपचे नेते डॉ. ताराचंद कराळे आणि जयसिंग एरंडे यांनी प्रचारसभा व जनसंपर्कासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, एवढ्या जोरदार प्रचारानंतरही नगराध्यक्षपद त्यांच्या हातातून निसटले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवला आहे. निवडून आलेल्या 3 अपक्ष उमेदवारांपैकी 2 जण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित कार्यकर्ते असल्याने नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. 

या निकालानंतर मंचरमध्ये विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलाल उधळून आनंद साजरा केला. महायुतीतील पक्षांसाठी हा निकाल काहीसा आनंद आणि काहीसा नाराजी देणारा ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Fastag New Rules: Toll hit in the new financial year! Annual pass will become expensive from April 1; "this much" rupees will be spent on scissors in your pocket

Fastag New Rules: नव्या आर्थिक वर्षात टोलचा फटका! 1 एप्रिलपासून वार्षिक पास महागणार; खिशाला बसणार “एवढ्या” रुपयांची कात्री

Saturday, 14 March 2026, 21:57

लष्कर भरतीत “मुन्नाभाई”चा सुळसुळाट! पुण्यातील कूक परीक्षेसाठी आले डमी उमेदवार; विश्रांतवाडी पोलिसांकडून दोघांना बेड्या

Saturday, 14 March 2026, 20:54

पुणे पोलिसांची कामगिरी! कुख्यात टिपू पठाण टोळीला तिसऱ्यांदा मोक्का; हॉटेल व्यावसायिकाला धमकावणारा “पच्चीस” जेरबंद

Saturday, 14 March 2026, 20:10
Daund News: Thrilling shooting in Daund in the early hours of the morning! Goons fired bullets over a land dispute; Involvement of a criminal gang revealed

Daund News: दौंडमध्ये पहाटे गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून गुंडाने झाडल्या गोळ्या; गुन्हेगारी टोळीचा सहभाग उघड

Saturday, 14 March 2026, 19:14
Kadamwakvasti Gram Panchayat will soon set up a separate state-of-the-art waste project - Former Sarpanch Chittaranjan Gaikwad

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत लवकरच स्वतंत्र अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभारणार – माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड

Saturday, 14 March 2026, 18:40
Shocking News: I have killed my wife!" Husband's confession and excitement in front of the police; Husband goes straight to the police station after killing his wife

Shocking News: मी बायकोला मारून आलोय!” पोलिसांसमोर पतीचा कबुलीजबाब अन् खळबळ; पत्नीला संपवून पती थेट पोलीस ठाण्यात

Saturday, 14 March 2026, 18:19
Next Post
Pune-Mumbai Travel: Pune-Mumbai travel now in just 90 minutes! New highway of Rs 15000 crores connecting Atal Setu to Pune Ring Road approved

Pune-Mumbai Travel: पुणे-मुंबई प्रवास आता केवळ 90 मिनिटांत! अटल सेतू ते पुणे रिंग रोड जोडणारा 15000 कोटींचा नवा महामार्ग मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.