Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोरमध्ये ‘मी इथला भाई’ म्हणून दहशत माजविणाऱ्या टोळीला अटक; पोलिसांची ‘सिने स्टाईल’ कारवाई, टीप मिळाली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 14:21
Loni Kalbhor News: Gang who spread terror in Loni Kalbhor by saying 'I am a brother from here' arrested; Police take 'cine style' action, tip received and...

पुणे: पुणे शहरातील लोणी काळभोर (Loni Kalbhor News) आणि हडपसर परिसरात (Hadapsar News) भाईगिरी करत दहशत माजवणाऱ्या सराईत टोळीप्रमुखासह (Pune Crime) त्याच्या एका साथीदाराला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांकडून 2 पिस्टल आणि 1 जिवंत काडतूस जप्त केले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

 

अटक करण्यात आलेल्यांची नावे शुभम कैलास कामठे, वय 30, राहणार कदमवाक वस्ती, लोणी काळभोर आणि शुभम श्रीमंत रसाळ, वय 19, राहणार पावर हाऊस शेजारी, फुरसुंगी अशी आहेत. शुभम कामठे हा सराईत गुन्हेगार असून लोणी काळभोर आणि हडपसर परिसरात आपल्या टोळीच्या जोरावर दहशत निर्माण करत होता. त्याच्यावर विविध स्वरूपाचे एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या टोळीविरुद्ध 2021 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात तो गेल्या 7 महिन्यांपासून फरार होता.

खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 18 डिसेंबर रोजी दुपारी पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आझाद पाटील आणि पवन भोसले यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार शुभम कामठे हा रॉयल स्टे इन हॉटेलसमोर कोणाची तरी वाट पाहत असून त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना पाहताच दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. झडतीदरम्यान शुभम कामठे याच्या कमरेला एक पिस्टल आणि पॅन्टच्या खिशात 1 जिवंत काडतूस आढळून आले. त्याच्यासोबत असलेल्या शुभम रसाळ याच्याकडूनही एक पिस्टल जप्त करण्यात आले. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाणे येथे आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्यासह खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post

T20 World Cup 2026 Squad: T-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; पहा संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.