Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी काळभोर येथील अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 31 March 2026, 12:08

लोणी काळभोर, ता. 31: पुणे–सोलापूर महामार्गावर (Loni Kalbhor) भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवशक्ती टायर्ससमोर 27 मार्चला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर कार चालक हा मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला होता.

 

तेजस संतोष साळुंखे (वय 21) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी तेजसचे काका संभाजी सुरेश साळुंखे (वय 37, मांजरी खुर्द, ता. हवेली)) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस साळुंखे हा लोणी काळभोर (ता. हवेली) पृथ्वीराज कपूर हायस्कूल येथे बी.कॉम अंतिम वर्षाचा पेपर देऊन मोटारसायकलने घरी परतत होता. शिवशक्ती टायर्ससमोर पुणे–सोलापूर महामार्गावर पोहोचताच एम.एच. 12एच.झेड. 0890 क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून तेजसच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात तेजस गंभीर जखमी झाला, तर त्याचा मित्र अभय पांडे (वय 21) यालाही दुखापत झाली. अपघातात तेजसच्या उजव्या हाताच्या पंजाला खोल जखम झाली असून चेहऱ्याच्या उजव्या बाजूस फ्रॅक्चर, हनुवटीवर जखम, छातीला मार तसेच डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्याचा मित्र अभय पांडे याच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर व डोळ्याच्या वर जखम झाली आहे. अपघातानंतर जखमींना प्रथम विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेजसची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील जहांगीर रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघात घडल्यानंतर कार चालकाने जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला आहे. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आज्ञात चालकाच्या विरोधात मोटरवाहन अधिनियम, 1988 चे कलम 119,134,177, 184 व भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 चे कलम 125(a),125(b),281, 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post

जावयांना सासरच्या मालमत्तेत वाटा मिळणार? उच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.