Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgaon News : ‘जो जास्त भाव देईल, तोच आमचा ऊस नेईल’; ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 14 October 2023, 17:16

गणेश सुळ

Kedgaon News : केडगाव : ऊसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या दौंड तालुक्यात दसर्‍यापासून कारखान्यांची धुराडी पेटण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, या वर्षीच्या अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटणार आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही. साखर भरण्याची वेळ असतानाच पाणी न मिळाल्याने वजन आणि साखर उतार्‍यावरही परिणाम जाणवणार आहे. त्यातच तालुक्यातील गुर्‍हाळे हे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव देत असल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी कारखाना हंगाम सुरू होण्याच्या आधीच गुर्‍हाळाला ऊस घालण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, तालुक्यातील साखर कारखान्यांपुढे गळीत हंगामाला गुर्‍हाळांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

ऊस उत्पादक शेतकरीवर्गाची पुन्हा गुर्‍हाळाकडे वाटचाल

दौंड तालुक्यात भीमा पाटस सहकारी कारखान्यासह अनुराज शुगर (यवत), श्रीनाथ म्हस्कोबा (पाटेठाण) आणि दौंड शुगर (आलेगाव) असे चार साखर कारखाने आहेत. गेल्या वर्षी भीमा पाटस कारखाना सुरू झाला आणि गुर्‍हाळाबरोबरच इतर साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला याचा फटका बसला गेला. मात्र, या वर्षी गुर्‍हाळाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 3000 रुपयांपासून ते 3100 रुपयांपर्यंत बाजारभाव दिला आहे. परिणामी, दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरीवर्ग पुन्हा गुर्‍हाळाकडे वाटचाल करू लागला आहे.

 

दौंड तालुक्यातील गुर्‍हाळांची दुकानदारी बंद करायची असेल तर साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्‍यांना गुर्‍हाळांच्या बरोबरीत अपेक्षित बाजारभाव देणे गरजेचे आहे. गुर्‍हाळाच्या तोडीत जर साखर कारखान्यांनी बाजारभाव दिला, तर शेतकरीवर्ग साखर कारखान्यांना ऊस घालेल व कारखान्याच्या गळीत हंगामांचे आपले उद्दिष्ट पूर्ण करेल, हे नक्की.

यंदाचे ऊस गाळप करणे ठरणार आव्हानात्मक

दौंड तालुक्यामध्ये साधारण 450 ते 500 गुर्‍हाळ आहेत. 24 तासांत 15 ते 25 टनांपर्यंत गुर्‍हाळे ऊस गाळप करत असतात आणि बाजारभावही 3100 रुपयांच्या वरून मिळतो आहे. यामुळे कारखान्याला यंदाचे ऊस गाळप करणे आव्हानात्मक ठरणार आहे. कारखान्याने जर 3500 रुपयेच्या आसपास बाजारभाव दिला, तर गुर्‍हाळाला फटका बसू शकतो. शिवाय तालुक्यांत 4 कारखाने व 500 गुऱ्हाळ असल्याने जो जास्त भाव देईल, तोच ऊस नेईल, अशी परस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

संजय थोरात, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड (ऊस उत्पादक शेतकरी)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post
Leo advance booking Vijay film to open big tickets worth 1.2 crore sold in India so far

रिलीज होण्यापूर्वीच विजयचा 'लिओ' सुपरहीट: 1.2 कोटी रुपयांच्या तिकिटांचे ॲडव्हान्स बुकिंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.