Saturday, February 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा 2026-27 चा अर्थसंकल्प एकमताने मंजूर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 28 February 2026, 11:52

आदित्य बोराटे 

इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा सुधारित व प्रस्तावित अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष भरत शहा अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे, विरोधी पक्षनेते अनिल पवार, मुख्याधिकारी रमेश ढगे, सर्व नगरसेवक तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

नगराध्यक्ष भरत शहा यांनी अर्थसंकल्प सादर करताना शहराच्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासावर भर दिला. पाणीपुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य सुविधा, रस्ते विकास, हरित उपक्रम, डिजिटल प्रशासन आणि मूलभूत पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, नागरिकांवर कोणतीही करवाढ न करता विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी अर्थसंकल्पातील आर्थिक बाबींचा सविस्तर आढावा मांडला. मागील आर्थिक वर्षातील शिल्लक रक्कम 1 कोटी 17 लाख 54 हजार 86 रुपये असून, सन 2026-27 साठी अंदाजित महसुली व भांडवली उत्पन्न 178 कोटी 49 लाख 45 हजार रुपये अपेक्षित आहे. तर एकूण अंदाजित खर्च 178 कोटी 92 लाख 26 हजार 400 रुपये इतका प्रस्तावित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा व गटार योजना तसेच विविध रस्ते प्रकल्पांना गती देण्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, क्रीडा महोत्सव, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, संगणकीकरण व नागरिक सुविधा केंद्रांच्या बळकटीकरणासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे.

वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेऊन नवीन रस्ते, प्रशासकीय इमारत तसेच आवश्यक नागरी सुविधा उभारण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. सखोल चर्चेनंतर उपनगराध्यक्ष शैलेश पवार उर्फ बाळासाहेब ढवळे आणि विरोधी पक्षनेते अनिल पवार यांनी सकारात्मक सूचना मांडल्या.

शहराच्या पारदर्शक, लोकाभिमुख आणि शाश्वत विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत सर्व सदस्यांनी एकमताने अर्थसंकल्पास मंजुरी दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Indapur : इंदापूर नगरपरिषदेचा 2026-27 चा अर्थसंकल्प एकमताने मंजूर

Saturday, 28 February 2026, 11:52

Mula-Mutha river : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या कचऱ्यामुळे मुळा-मुठा नदी पेटली; 24 तास धुमसणाऱ्या कचऱ्याने 25 हजार नागरिकांचे आरोग्य टांगणीला

Saturday, 28 February 2026, 11:29

Bolivia Plane Crash : बोलिव्हिया हादरले; हवाई दलाचे विमान रस्त्यावर कोसळले, 15 जणांचा मृत्यू, 30 जखमी

Saturday, 28 February 2026, 11:11

Registration and Stamps Department : नोंदणी व मुद्रांक विभागातील गट – ड संवर्गातील अंतिम निवड यादी जाहीर

Saturday, 28 February 2026, 10:29

Khandala Ghat Train Accident : भयंकर थरार! खंडाळा घाटात सुसाट मालगाडीचे ब्रेक निकामी; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Saturday, 28 February 2026, 10:16

Sarpanch Administrator : राज्यातील सरपंचांचे टेन्शन वाढले! प्रशासक म्हणून काम करण्याच्या आशेवर पाणी; हायकोर्टाने नेमकं काय म्हटलंय?

Saturday, 28 February 2026, 9:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.