Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी..

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 November 2026, 8:41
Accident

Accident

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन हद्दीतील खेडेकर मळा परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला.

श्रावण सुरेश कतारी (वय वर्ष – तरुण, रा. यवत, ता. दौंड) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे, तर रोहित बाळू काळे (रा. यवत, ता. दौंड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण कतारी आणि रोहित काळे हे दोघे मित्र आपल्या दुचाकीवरून पुण्याच्या बाजूकडून घराकडे (यवतकडे) निघाले होते. सोमवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी उरुळी कांचन हद्दीतील खेडेकर मळा परिसरातील ‘मातोश्री हॉटेल’ समोर आली.

त्यावेळी पाठीमागून किंवा समोरून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात श्रावण कतारी यांना डोक्याला व शरीरास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोहित काळे यांच्या पायाला व शरीराला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले.

अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे, रतन चव्हाण आणि माऊली लाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने दोन्ही अपघातग्रस्तांना उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच श्रावण कतारी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या रोहित काळे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात वाहनचालक आपली गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या मनमानीला आता लगाम? विकासकामांच्या निधीबाबत महापालिकेचा मोठा निर्णय

Monday, 2 November 2026, 9:18

Pune news: दुसऱ्या महिलेला भेटायला निघाला पती, पत्नीने अडवताच संतापला! थेट गळा पकडून केली मारहाण; दातही तोडला

Monday, 2 November 2026, 9:06
Accident

उरुळी कांचन येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी..

Monday, 2 November 2026, 8:41

देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये कोणाची कामगिरी ठरली भारी? कोणाला मिळाले अव्वल स्थान? जाणून घ्या

Monday, 2 November 2026, 8:14

अवकाळी पावसाचं संकट घोंगावलं! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Monday, 2 November 2026, 7:55

Daily Horoscope: 2 नोव्हेंबरपासून बदलणार नशिबाचा खेळ! कोण होणार मालामाल, कोणाला करावा लागणार संघर्ष?

Monday, 2 November 2026, 7:41
Next Post

Pune news: दुसऱ्या महिलेला भेटायला निघाला पती, पत्नीने अडवताच संतापला! थेट गळा पकडून केली मारहाण; दातही तोडला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp