Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Haveli Panchayat Samiti : हवेली पंचायत समितीच्या गटनेतेपदी युवराज वांजळे; सभापतीपदाच्या राजकारणाला वेग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 February 2026, 18:03

Haveli Panchayat Samiti : लोणी काळभोर, ता. 23 : हवेली तालुका पंचायत समितीच्या सत्तासमीकरणात नवे राजकीय वारे वाहू लागले असून खानापूर गणाचे सदस्य युवराज नारायण वांजळे यांची गटनेतेपदी निवड झाल्याने तालुक्यातील राजकारणात मोठी कलाटणी मिळाली आहे. या निवडीमुळे आगामी सभापतीपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सोमवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते वांजळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, नवनिर्वाचित सदस्य युवराज काकडे, मनोज ऊर्फ कृषिराज चौधरी, कोमल कांबळे, सुषमा मुरकुटे, अमोल टेकाळे, विद्या गायकवाड, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, शिंदवणेचे माजी सरपंच अण्णा महाडिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हवेली पंचायत समितीच्या एकूण 12 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ने सर्वाधिक 6 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला 4, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ला 1 जागा मिळाली असून 1 उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाला आहे. अपक्ष सदस्य विद्या गायकवाड यांनी राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला असून शिवसेनेच्या सदस्याकडूनही ‘मूक पाठिंबा’ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने बहुमताचा ‘मॅजिक फिगर’ पार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

याच पार्श्वभूमीवर हवेली पंचायत समितीचा पुढील सभापती राष्ट्रवादीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, सभापतीपदासाठी पक्षांतर्गतच चुरस वाढली आहे. थेऊर गणातील विजयी सदस्य युवराज काकडे आणि कोरेगाव मूळ गणातील मनोज ऊर्फ कृषिराज चौधरी हे दोघेही प्रमुख दावेदार म्हणून समोर आले आहेत.

काकडे हे विकासकामांचा अनुभव आणि स्थानिक जनाधार यावर भर देत सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत. तर चौधरी यांनी संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपला दावा मजबूत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच ‘मैत्रीपूर्ण स्पर्धा’ निर्माण झाली असून पडद्यामागील बैठका, फोनाफोनी आणि राजकीय गणिते वेगाने बदलताना दिसत आहेत.

दरम्यान, गटनेतेपदी युवराज वांजळे यांची झालेली निवड ही आगामी सत्तासमीकरणाची नांदी मानली जात आहे. त्यामुळे हवेली तालुक्याच्या राजकारणाचे तापमान वाढले असून येत्या काही दिवसांत सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फ्लॅट मालकांना मोठा दिलासा! गृहनिर्माण सोसायट्यांची ‘मनमानी’ आता चालणार नाही; ‘समान देखभाल शुल्का’चा न्यायालयाचा आदेश

Monday, 22 June 2026, 20:57

रस्त्यावर रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न मृतदेह, कारचा चेंदामेंदा अन् विखुरलेले अवशेष; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार…

Monday, 22 June 2026, 20:14

पुण्यात सायबर चोरट्याचा प्रताप! ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे’ वडिलांना व्हिडीओ कॉल केला, मुलीचे हात-पाय बांधलेले दाखवले अन्…

Monday, 22 June 2026, 19:32

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04
Next Post
Supreme Court

Supreme Court : मोठी बातमी! ५० टक्क्यांची भिंत नडली; २२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीला ब्रेक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.