पुणे : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. ते ७४ वर्षांचे होते. जुन्नर विधानसभेचे त्यांनी अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
सोमवारी १२ फेबुवरीला सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक(ता. जुन्नर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जुन्नर विधानसभा मतदार संघातून सलग सहावेळा (१९८५ ते २००९) निवडणूक लढवून त्यातील चार वेळा ते निवडणूक जिंकले होते.