Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांनो! कर्जमाफीच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम चुकीची वाटते? सरकारने सांगितली पुढची प्रक्रिया

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 30 July 2026, 7:59

पुणे: राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लाभार्थी याद्या आणि अधिकृत योजना पोर्टलवरील थकबाकीच्या रकमेतील फरकाबाबत अनेक शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केल्या होत्या. यावर सहकार आयुक्त तथा निबंधक दीपक तावरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

त्यांच्या माहितीनुसार, गावात लावलेल्या यादीतील रक्कम आणि अधिकृत पोर्टलवरील थकबाकीची रक्कम वेगवेगळी दिसत असल्यास, पोर्टलवर नमूद केलेली रक्कमच अंतिम मानली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता पोर्टलवरील माहितीचीच खात्री करावी.

शासनाने स्पष्ट केले आहे की, पोर्टलवर दाखवलेली थकबाकीची रक्कम ही 31.03.2026 पर्यंतच्या नोंदीनुसार निश्चित करण्यात आली आहे. तसेच 01.07.2026 रोजी सर्व बँकांना पत्र पाठवून 01.04.2026 नंतरचे व्याज आकारू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांना सर्व बँकांनी लेखी संमती दिल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

पोर्टलवरील रक्कम योग्य असल्याचे शेतकऱ्यांना वाटत असल्यास त्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला पावती दिली जाईल. या पावतीमध्ये कर्जमुक्तीसाठी मंजूर झालेल्या रकमेची संपूर्ण माहिती नमूद असेल.

यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट DBT पद्धतीने रक्कम जमा केली जाणार आहे. रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित बँक शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीचे प्रमाणपत्र देईल. तसेच लाभार्थ्यांची नावे बँक शाखा आणि विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. कर्जमुक्तीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, पोर्टलवरील माहिती चुकीची वाटत असल्यास शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारींची छाननी आणि निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष जिल्हास्तरीय समिती कार्यरत राहणार आहे.

योजनेबाबतची आकडेवारीही शासनाने जाहीर केली आहे. बँकांनी आतापर्यंत 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी पडताळणीनंतर 25.07.2026 रोजी 16.96 लाख कर्जखात्यांची अंतिम यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या 7.03 लाख खात्यांचा, तर व्यापारी बँकांच्या 9.93 लाख खात्यांचा समावेश असल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तक्रार; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Thursday, 30 July 2026, 8:26

इराणने डागली क्षेपणास्त्रे अन् ट्रम्प संतापले! ‘आता आमची पाळी’ म्हणत अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई सुरू

Thursday, 30 July 2026, 8:13

शेतकऱ्यांनो! कर्जमाफीच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम चुकीची वाटते? सरकारने सांगितली पुढची प्रक्रिया

Thursday, 30 July 2026, 7:59

मान्सूनचा रौद्रावतार! महाराष्ट्रातील ‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता

Thursday, 30 July 2026, 7:45

Daily Horoscope: गुरुवारचा महायोग! गुरुच्या आशीर्वादाने ‘या’ राशींची होणार चांदी; पाहा आजचे राशीभविष्य

Thursday, 30 July 2026, 7:37

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली!जुलैचे 1500 रुपये कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

Wednesday, 29 July 2026, 23:20
Next Post

इराणने डागली क्षेपणास्त्रे अन् ट्रम्प संतापले! 'आता आमची पाळी' म्हणत अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.