Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नसरापूरमध्ये चहाच्या दुकानात सत्तूर काढून हल्ल्याचा प्रयत्न, वादातून शेतकऱ्याच्या हाताला जखम; राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 January 2026, 10:50
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

प्रतिनिधी विशाल शिंदे

 

Bhor Crime: भोर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे भरदिवसा चहाच्या दुकानात सत्तूर काढून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत फिर्यादीच्या हाताला जखम झाली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सचिन मानसिंग जाधव (वय ३४, व्यवसाय – शेती, रा. नायगाव, ता. भोर) हे सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत नसरापूर येथील बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिर परिसरात चप्पल काढण्याच्या कारणावरून त्यांचा मंगेश हणुमंत शिंदे (रा. देगाव, ता. भोर) याच्याशी शाब्दिक वाद झाला.

वादानंतरही आरोपी शांत न होता काही वेळातच त्याने फिर्यादी यांच्या चारचाकी वाहनाला नसरापूर येथील जानकीराम मंगल कार्यालयाजवळ आपली बुलेट दुचाकी आडवी लावून अडवले. त्यानंतर फिर्यादी हे नसरापूर येथील एका चहाच्या दुकानात मित्रांसोबत चहा पित असताना आरोपी तेथे पोहोचला.

यावेळी आरोपीने मफलरमध्ये गुंडाळून आणलेला धारदार सत्तूर अचानक बाहेर काढून फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपला जीव वाचवण्यासाठी फिर्यादींनी आरोपीच्या हातातील सत्तूर पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्या झटापटीत फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला जखम झाली. तसेच आरोपीने फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर फिर्यादी यांनी तात्काळ राजगड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आर्म अॅक्ट तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार तळपे करीत असून, दाखल अंमलदार म्हणून मपोहवा निकम यांनी कारवाई केली आहे.

दरम्यान, नसरापूर परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित आरोपी यापूर्वीही विविध गावांमध्ये लोकांना त्रास देणे, शिवीगाळ करणे व दहशत निर्माण करणे यासाठी ओळखला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची चर्चा असून, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात नसरापूर व परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरलं! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post

वाढदिवसाला न बोलावल्याने शेतकऱ्याचे घरच पेटवले, माथेफिरू तरुणाच्या कृत्याने संपूर्ण कुटुंब रस्त्यावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.