पुणे: पुण्यातील मंचर नगरपंचायतीच्या (Ajit Pawar) निवडणुकीच्या (Manchar News) निमित्ताने आज (शुक्रवारी, 28 नोव्हेंबर 2025) राज्याच्या (Pune News) राजकारणातील दोन मोठे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मंचर नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपसोबत युती झाली आहे आणि त्यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे. आज अजित पवार आणि भाजपची सभा मंचरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे अजित पवार पुन्हा एकदा एका प्रश्नामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. अजित पवारांनी मंचावर उपस्थित असलेल्या महिला उमेदवाराला थेट ‘लव्ह मॅरेज झालंय काय?’ असा प्रश्न विचारला. मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, “मोनिकाताईंचं माहेर पण इथेच आहे आणि सासर पण इथेच आहे, बरोबर आहे ना? मग लव्ह मॅरेज आहे का काय?” या प्रश्नानंतर सभेत उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.
मंचरनगर पंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी #Ajitpawa यांनी सभेत बोलताना #राष्ट्रवादी #भाजप युतीच्या #नगराध्यक्ष पदाच्या #उमेदवार मोनिका बाणखेले-बेंड यांची ओळख करून देताना त्यांचे माहेरही मंचर असल्याचे व सासरही मंचर असल्याचे सांगताना. लव्ह मॅरेज आहे का? प्रश्न विचारताच सभेत हशा पिकला pic.twitter.com/SxoQYfuqR9
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 28, 2025
Video Credit- @KhaneAnkita
अजित पवारांनी पुढे याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “सासर-माहेर जवळ असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.” सासर आणि माहेर एकाच गावात असल्याने त्यांनी गंमतीने हा प्रश्न विचारल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी हलके-फुलके झाले. मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीतील युती असूनही दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये थेट राजकीय सामना रंगल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.






