Pune Crime : पुण्यातील बोपदेव घाट परिसरात असलेल्या एका लॉजवर कोंढवा पोलिसांनी छापा टाकला. या लॉजमध्ये तरुणींना जबरदस्तीने देहव्यवसायासाठी लावले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात लॉजचा व्यवस्थापक आणि एक कामगार अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

रवी छोटे गौडा (वय ४६, रा. येवलेवाडी) आणि सचिन प्रकाश काळे (वय ४०) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी या लॉजमधून दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानंतर पथकाने लॉजवर छापा टाकला. चौकशीत व्यवस्थापकाने दलालांच्या मदतीने तरुणींना इथे आणल्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणींच्या अडचणींचा फायदा घेऊन त्यांना धमकावले जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रकरणामागे मोठे मानवी तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, दलाल आणि मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.







