पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक यंदा केवळ (Thergaon News) स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती राज्याच्या राजकारणात (Pune Mahapalika Election) प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक (Shrirang Barne) अत्यंत महत्त्वाची (Vishwajit Barne) मानली जात असताना, प्रभाग क्रमांक 24 मधील लढत राजकीयदृष्ट्या अधिकच चुरशीची झाली आहे. (Latest Marathi News)

या प्रभागात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र विश्वजीत श्रीरंग बारणे, त्यांचा पुतण्या आणि भाची एकाच वेळी निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे खासदार बारणे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या प्रभागाकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचंच नव्हे, तर राज्याच्या राजकारणाचंही लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या लढतीला गंभीर वळण लागलं असून भाजप पुरस्कृत उमेदवार गणेश गुजर आणि करिष्मा बारणे यांनी विश्वजीत बारणे आणि त्यांच्या समर्थकांवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे सत्तेत युती असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्येच उघड संघर्ष सुरू झाला आहे.
भाजप पुरस्कृत उमेदवारांचा दावा आहे की, थेरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप सुरू असून मतदारांवर दबाव टाकला जात आहे. खासदारांचा मुलगा असल्यामुळे शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा विश्वजीत बारणे यांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

“ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. विकासाच्या नावावर नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे आता मते विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप भाजप पुरस्कृत उमेदवारांनी केला.
थेरगाव परिसरात 10 ते 15 हजार मतदारांना पैसे देण्याची तयारी असल्याचा दावाही त्यांनी केला असून, दहा रुपयांच्या नोटेवर ‘हवाला’ देऊन नंतर पैसे देण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विश्वजीत बारणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो होऊ शकला नाही.
ही निवडणूक केवळ एका प्रभागाची नसून, सत्तेतील पक्षांमधील अंतर्गत संघर्ष, घराणेशाही आणि पैशाच्या राजकारणावर जनतेची भूमिका काय असेल, याचा फैसला करणारी ठरणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 24 मधील ही लढत संपूर्ण पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.







