Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: “अजित दादांना कशाला चॅलेंज करता, मीच येतो समोर!” नीलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणावरून रोहित पवारांचं मोहोळांना ओपन चॅलेंज

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 10 January 2026, 8:03
Pune Politics: "Why are you challenging Ajit Dada, I will come forward!" Rohit Pawar's open challenge to Mohola over Nilesh Ghaywal's passport case

पुणे: महापालिका निवडणुकीत भारतीय (Pune Politics) जनता पक्षाचा पराभव झाला तर (Pune Mahapalika Nivadnuk) त्याचे खापर आपल्यावर फुटेल, या भीतीने केंद्रीय सहकार राज्यमंत्री (Murlidhar Mohol) मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुणे निवडणूक प्रभारी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी शुक्रवारी केली. गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याला पारपत्र देण्याच्या विषयावरून मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना चॅलेंज दिले आहे. मात्र दादांना कशाला चॅलेंज करता, गुंडाच्या पारपत्राबाबत मीच तुमच्याशी बोलायला तयार आहे, अशी टिप्पणीही रोहित पवार यांनी केली. (Latest Marathi News)

 

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वारजे परिसरात आले असताना रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. याबाबत अजित पवार आपली भूमिका मांडत होते. मात्र भाजपकडून शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांना आणि विविध व्यवसायांना अडचणी निर्माण केल्या जात आहेत. ठेकेदार आणि व्यावसायिकांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची अक्षरशः वाताहत झाली आहे. शहराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता, तसा विकास सत्ताधाऱ्यांनी केला नाही. आमदार महेश लांडगे भाषणात बांगड्या भरल्या नाहीत असे वक्तव्य करतात, यातून महिलांचा अपमान होत असल्याचे स्पष्ट दिसते. आमदार लांडगे यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर येऊ लागला असून त्यामुळेच तेही घाबरले असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

मोहोळ यांचा दिल्लीतील संपर्क वाढला आहे. त्यांच्या या संपर्कातून नेमका कोणी त्यांचा गेम केला हे सुद्धा आम्ही सांगू शकतो, अशी सूचक टिप्पणी करत रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30
Next Post
Maharashtra Politics: "I ate Congress mutton all my life and now you are asking me to press the lotus button?" Vadettiwar's scathing criticism of Ashok Chavan

Maharashtra Politics: "आयुष्यभर काँग्रेसचं मटण खाल्लं अन् आता कमळाचं बटन दाबायला सांगताय?" वडेट्टीवारांची अशोक चव्हाणांवर सणसणीत टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.