पुणे: अजित पवार यांच्या (Pune Politics) नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) पक्षाने पुणे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांना (Devendra Fadanavis) तिकिटे दिल्याने राजकीय (Andekar Gang) वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर अजित पवार यांच्यावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदेकर नावाच्या नामचिन गुन्हेगारी टोळीशी संबंधित कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयावरून प्रचारात विरोधकांकडून सरकारवर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थेट अजित पवार यांना लक्ष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्याकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नव्हते. एकीकडे कोयता गँग आणि गुन्हेगारी संपवण्याची भाषा केली जाते आणि दुसरीकडे गुन्हेगारांच्या कुटुंबातील लोकांना तिकिटे दिली जातात, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यांना तिकिटे देण्यात आली आहेत त्यांच्या कुटुंबातील लोक पुण्यात टोळ्या चालवणारे, हिंसा करणारे, खून आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.
अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी संधी देताना आपण शहराला कुठल्या दिशेने नेत आहोत, याचा विचार केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. राजकीय पक्षच जर गुंडांना आश्रय देणार असतील तर त्याचा थेट परिणाम पोलिसांच्या मनोबलावर होतो आणि त्यांचे मनोधैर्य खचते, असेही त्यांनी सांगितले.

पोलिस यंत्रणा मजबूत करण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शहरांमध्ये सीसीटीव्ही वाढवण्यात आले असून एआयच्या मदतीने स्ट्रीट क्राइम रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जवळपास 50000 पोलिसांची भरती पूर्ण झाली असून पोलिसांच्या सेवा नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पोलिस वसाहतींचे आधुनिकीकरणही करण्यात आले आहे, असेही त्यांनी नमूद केले. या वक्तव्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.






