पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची (Pune Politics) अभिनेत्री गिरीजा ओक हिने ‘संवाद पुणेकरांशी’ या कार्यक्रमात (Devendra Fadanavis) मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस (Ajit Pawar) यांनी पुणे, पिंपरी चिंचवड आणि महापालिका निवडणुकीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. (Pune Mahapalika Nivadnuk)

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. अजित दादा म्हणतात माझं काम बोलतं, पण या निवडणुकीत सुरुवातीलाच लक्षात आलं होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढता येणार नाही. दोन्ही ठिकाणी भक्कम पक्ष आहेत आणि आम्ही नंबर एकचा पक्ष आहोत, असं त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, आम्ही आधीच ठरवलं होतं की वेगवेगळं लढायचं आणि जिथे आपण लढतोय तिथे मैत्रीपूर्ण लढत समजायची. मी आतापर्यंत संयम पाळला आहे, मात्र निवडणुकीतील स्थिती पाहता दादांचा संयम थोडा ढळलेला दिसतोय. 15 तारखेनंतर ते काही बोलणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरे यांनी मला क्रेडिट दिलं याचा आनंद आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं ते दोघे एकत्र येत असतील तर त्याचा मला आनंद आहे.

अजित पवारांच्या मोफत मेट्रो प्रवासाच्या घोषणेवर टोला लगावत फडणवीस म्हणाले की, पुण्यातून जितकी विमानं उडतात तेवढ्या विमानांमध्ये महिलांना मोफत तिकीट देण्याची घोषणा करायला हवी होती. लोकांचा विश्वास बसेल अशाच घोषणा केल्या पाहिजेत. मेट्रो एकट्या राज्याची नसते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुणेकर कर भरणारे नागरिक आहेत. त्यांना चांगली मेट्रो आणि बस सेवा हवी आहे. पुण्यातील टेकड्या टिकल्या पाहिजेत आणि तिथे झालेलं अतिक्रमण हटवून पुनर्वसन झालं पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं. पुण्याचा पाणी प्रश्न लवकरच सुटेल आणि भविष्यासाठी नवीन जलस्रोत निर्माण करावे लागतील, असंही फडणवीस यांनी सांगितलं.






