Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: पुण्यात भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी! शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची बाजी; आमदार पुत्रासह २२ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये ‘मेगा प्रवेश’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 10:04
Pune Politics: BJP's 'Operation Lotus' successful in Pune! BJP wins in Sharad Pawar's stronghold; 'Mega entry' of 22 big leaders including MLA's son into BJP

पुणे: राज्यात महापालिका (Pune Politics) निवडणुकांचा धुरळा उडू लागल्यानंतर (Pune News) भाजपने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पुण्यातील (Sharad Pawar) वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू (Bapu Pathare) पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत 22 माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही भाजपमध्ये दाखल होणार असल्याने हा शरद पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. (Latest Marathi News)

 

बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वडगावशेरीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह माजी नगरसेवक विकास दांगट, बाळा धनकवडे, माजी नगरसेविका सायली वांजळे, रोहिणी चिमटे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांचाही भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांतील मिळून एकूण 22 माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

पुण्यात भाजपचं ऑपरेशन लोटस

या घडामोडींमुळे पुण्यात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे. एकाच वेळी 22 दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असून त्यामध्ये आमदारपुत्राचाही समावेश आहे. शुक्रवारी पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आज होणाऱ्या मेगा प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध पक्षांतील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली.

मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आज अनेक नेत्यांचा प्रवेश होणार असून पुढील टप्प्यातील प्रवेशांची तारीख भाजपकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.

पुण्यात भाजपचा निर्धार

दरम्यान भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील आमदार, नेते आणि निवडणूक प्रमुखांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पुणे महापालिकेत 120 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. प्रभागनिहाय युनिट तयार करणे, निवडणूक प्रमुखांची जबाबदारी ठरवणे, विविध कार्यक्रम आणि मेळावे घेणे तसेच टेक्निकल टीमची नेमणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजप आणि शिवसेनेची संयुक्त बैठकही पार पडली असून महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवण्यावर एकमत झाले आहे. पुढील बैठकीत जागावाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पुणे शहरात भाजपचे संख्याबळ निर्विवाद असल्याचा दावा करण्यात येत असून, निवडणूक मेरिटनुसार शिवसेनेला जागा दिल्या जातील, असे सांगण्यात आले. पुणे शहर भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात 120 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post

Pune Navle Bridge: प्रवासांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, नवले पूल परिसरात सेवा रस्त्याचे काम रखडले; प्रशासकीय प्रक्रियेमुळे विलंब

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.