पुणे: महाराष्ट्र शिवजयंतीच्या उत्सवात (Pune News) उद्या (गुरुवारी, १९ फेब्रुवारी) अवघा न्हाऊन निघणार आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात भवानी माता मंदिरापासून निघणाऱ्या भव्य मिरवणुकीने शिवजन्मोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचणार आहे. मात्र, या भव्य मिरवणुकीमुळे आणि शिवप्रेमींच्या गर्दीमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी (PMPML) प्रशासनाने अनेक महत्त्वाच्या मार्गावरील बसेस वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

भवानी पेठ ते सिव्हिल कोर्टातील शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत निघणाऱ्या मिरवणुकीमुळे मध्य भागातील रस्ते वाहनांसाठी बंद केले जातात. मुख्य रस्ते मिरवणुकीसाठी राखून ठेवल्यामुळे, प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
तुमच्या बसचा मार्ग बदललाय का? पाहा:
पुणेकरांना प्रवासाचे नियोजन सोपे व्हावे यासाठी प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत:
| मुख्य मार्ग (बंद असणारे रस्ते) | बस क्रमांक (Route No.) | पर्यायी वळवलेला मार्ग |
| जंगली महाराज रोड ते स्वारगेट | २, १०, ११, १७, २१, ३७, ३८, २१६ | बालगंधर्व → डेक्कन → अलका टॉकीज → कुमठेकर रोड → मंडई → स्वारगेट. |
| मनपा भवन ते शिवाजी पुतळा | ३५, ३६, ८२, ९९, ११५, १५२ | ढोले पाटील रोड आणि फर्ग्युसन (FC) रोड. |
| लक्ष्मी रोड (मिरवणुकीदरम्यान) | सर्व लक्ष्मी रोड मार्गे जाणाऱ्या बसेस | पुणे स्टेशन → गोळीबार मैदान → स्वारगेट. |
| फडके हौद ते दारूवाला पूल | ९, ५७, ८१, ९४, १०८, १७४ | कुंभारवाडा → जुना बाजार → मंगळवार पेठ → पुणे स्टेशन. |
दरम्यान, केलेले बदल लक्षात घेऊन तुमचं नियोजन करा म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.







