Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune BJP News: सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाने पुण्यात ‘टीम देवेंद्र’ अधिक भक्कम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 20 December 2025, 12:59

प्रतिनिधी अमित मुंडीक 

 

Pune BJP News:  पुणे:  पूर्व पुण्यातील प्रभावी, अभ्यासू आणि संघटनात्मक ताकद म्हणून ओळख असलेले सुरेंद्र पठारे यांनी अखेर भारतीय जनता पक्षमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पूर्व पुण्यात भाजपची पकड अधिक मजबूत होणार असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. (Surendra Pathare joins BJP)

हेही वाचा- BARAMATI CRIME: बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या भावावर कोयत्याने हल्ला; वर्षभर फरार असलेल्या सराईत आरोपीला अटक

सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील ‘टीम देवेंद्र’ अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाभिमुख आणि दूरदृष्टीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांनी पुण्यात सुमारे ३००० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले होते. पुणे हे केवळ सांस्कृतिक शहर नसून टेक्नोसेवी आणि जागतिक स्तरावर कामगिरी करणारे शहर म्हणून पुढे जाण्याची क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते. त्यांचा ‘भविष्यातील पुणे’ हा संकल्प साकारण्यासाठी व्हिजन असलेले, अभ्यासू आणि जमिनीवर काम करणारे नेते आवश्यक आहेत. त्या दृष्टीने सुरेंद्र पठारे हे भाजपसाठी महत्त्वाची ताकद ठरू शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे यांचा मोलाचा वाटा होता. प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली होती. नियोजनबद्ध प्रचार, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याची क्षमता यामुळे त्यांची संघटनात्मक ताकद त्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आली. त्यानंतरच भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष त्यांच्या कामाकडे वेधले गेले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या, आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सुरेंद्र पठारे यांची ओळख केवळ राजकीय नेते म्हणूनच नव्हे, तर शैक्षणिकदृष्ट्याही भक्कम व्यक्तिमत्त्व म्हणून आहे. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, त्या काळात ते गोल्ड मेडलिस्ट होते. लोहगाव, वाघोली, खराडी, चंदननगर यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. यापूर्वी त्यांनी अर्बन डेव्हलपमेंट, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले असून, त्याला पूर्व पुण्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

एकूणच, सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे पूर्व पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, आगामी महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47
Next Post
Land Registration: Beware! Buying land or a house? Your registration can be cancelled due to 'this' mistake; Read 'this' rule carefully, otherwise you will regret it

Land Registration: सावधान! जमीन किंवा घर घेताय? 'या' एका चुकीमुळे तुमची रजिस्ट्री होऊ शकते रद्द; 'हे' नियम नक्की वाचा, अन्यथा होईल पश्चाताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.