अमित मुंडीक

पुणे: दिल्लीतील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुणे शहरातही सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे.
दरम्यान, पुण्यातील रेल्वे स्टेशन, बस स्थानक, विमानतळ तसेच ऐतिहासिक स्थळांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.







