Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिमानास्पद! शेतकऱ्याचा मुलगा नवनाथ फडतरे नेट जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण; सलग तिसऱ्यांदा विक्रमाला गवसणी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 January 2024, 13:19

लोणी काळभोर : बोपगाव (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्याचा मुलगा नवनाथ दिनकर फडतरे हा राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता अर्थात नेट जेआरएफ परिक्षेत उत्तीर्ण झाला आहे. फडतरे याने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पास होण्याचा विक्रम तिसऱ्यांदा रचला आहे. त्यामुळे फडतरे याचे पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात भरभरून कौतुक होत आहे.

 

नेट जेआरएफची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत फडतरे यांना कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) मिळाली आहे. नवनाथ यांचे वडील दिनकर हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. बंधू अ‍ॅड. दत्तात्रय फडतरे हे सासवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत. आईने शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले तर बंधू राकेश यांचे सहकार्य होत असल्याची भावना नवनाथ यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नवनाथ यांचा शैक्षणिक आलेख आणि गरुडझेप सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

नवनाथ फडतरे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर अकरावी-बारावीचे शिक्षण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात झाले आहे. पदवीचे शिक्षण त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नोलॉजी अर्थात आय.आय.टी. गुवाहाटीमधून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. नवनाथ हे शिक्षण घेत असताना शेतातील कामे, डोंगरावर जनावरांना चारायला नेताना इंग्रजी पुस्तकांचे वाचन करणे, प्रवास करताना, बसमधून ये-जा करताना मोकळ्या वेळेत इंग्रजी व्याकरण आणि शब्दभंडार वाढविण्यावर कायम भर देत असत. याचा त्यांना फायदा होत गेला.

नवनाथ फडतरे यांनी कोणताही क्लास न लावता आय.आय.टी. प्रवेश, गेट परीक्षा तसेच यापूर्वी इतिहास मधून नेट, आता संरक्षण आणि सामरिक शास्त्र विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच आय.आय.टी. गुवाहाटी, आसाम राज्य येथून “इंडियन डिप्लोमॅटीक हिस्टरी अॅण्ड इंटरनॅशनल हिस्टरी”मध्ये पीएचडी करत आहेत.

दरम्यान, पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून शिक्षण दिल्यानंतरच, खासगी शिकवणीसाठी लाखो रुपयांची फी भरल्यानंतरच मुलं-मुली यशस्वी होतात हे चुकीचे आहे.
परिस्थितीचा बाऊ न करता, कोणतीही कारणे न सांगता, भरपूर मेहनत आणि ज्या क्षेत्रात जायचे, त्या क्षेत्रात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले तर सर्वसामान्य, गोरगरिब शेतकरी कुटुंबातील मुलं– मुली देखील आपल्या आई-वडीलांचे नाव उंचावून समाजात चांगले आदर्श निर्माण करु शकतात, हे फडतरे यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Next Post

'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना ते पवन कल्याण 'या' कलाकारांनी अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी केलं 'इतकं' दान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.