Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sanjog Waghere: “मावळचा वाघ” आता कमळ हाती घेणार! पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा धक्का; संजोग वाघेरेंनी सोडली मशाल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 21:13
Sanjog Waghere: "The Tiger of Maval" will now take up the lotus! Big blow to Thackeray in Pimpri-Chinchwad; Sanjog Waghere passes on the torch

पिंपरी-चिंचवड: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या (Sanjog Waghere) निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया (Udhhav Thackeray) पार पडणार आहे, तर 16 जानेवारी रोजी निकाल (Pimpri-Chinchwad News) जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर (Pune Politics) राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक पक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. अशातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. (Breaking News)

 

शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या पदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे ठाकरे गटाची मोठी कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

संजोग वाघेरे यांनी 18 डिसेंबर रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नव्या भूमिकेत काम करण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात ते मैदानात उतरले होते. मात्र या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पुन्हा विजय मिळवला आणि संजोग वाघेरे यांचा पराभव झाला.

संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. ते माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते तीन वेळा नगरसेवक राहिले असून त्यांनी महापौरपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. त्यांच्या पत्नीही नगरसेविका होत्या. सलग 8 वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष होते आणि शरद पवार तसेच अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असून, संजोग वाघेरे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51
Next Post

भारताचे तुकडे करण्याचं पाकिस्तान नव्हे, 'या' महासत्तांचं मोठं कारस्थान- माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.