पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित (Rohit Pawar) पवार यांच्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. रोहित (Pune Politics) पवार आज शहरात एका (Pimpri-Chinchwad News) बैठकीसाठी येत असून ते मुंबईहून हेलिकॉप्टरने पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी कंपनीच्या हेलिपॅडवर उतरणार होते. त्यांना घेण्यासाठी आलेल्या वाहनांची पोलिसांनी तपासणी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू असल्याने ही तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या तपासणीवरून रोहित पवार यांनी थेट निवडणूक आयोगावर टीका केली आहे. सत्ताधारी नेत्यांच्या अवजड बॅगांची तपासणी होत नाही, पण आमच्या रिकाम्या गाड्यांची कसून तपासणी केली जाते, असा टोला त्यांनी लगावला आहे.
रोहित पवार यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे. आचारसंहितेचा भाग म्हणून वाहनांची तपासणी होत असली, तरी ती सर्वांसाठी समान असायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. सत्ताधारी नेत्यांच्या बॅग तपासल्या जात नाहीत आणि विरोधकांच्या रिकाम्या वाहनांची तपासणी केली जाते, हे दुजाभावाचे उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली आहे.
तसेच त्यांनी कार्यक्षम आणि तत्पर निवडणूक आयोगाचे उपरोधिक शब्दांत कौतुक करत, सत्ताधाऱ्यांना वेगळे आणि विरोधकांना वेगळे नियम लावले जात असल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आचारसंहिता अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.






