अमित मुंडीक

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pune Election) निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad Mahapalika Election) पोलिसांनी व्यापक तयारी करत कडक बंदोबस्त व धडक कारवाई सुरू (Pune Police) केली आहे. दिनांक १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून, पोलीस आयुक्तालय हद्दीतील ४२० इमारतींमध्ये एकूण २१३५ मतदान केंद्रांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ९६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, ५० उपद्रवींना जिल्ह्याबाहेर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध धंद्यांविरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात दारू, अंमली पदार्थ व शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच सराईत गुन्हेगार, टोळ्या व समाजकंटकांवर एमपीडीए व मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी शहरातील विविध भागांत रूट मार्च काढण्यात आले असून, शेवटच्या टप्प्यात गस्त, नाकाबंदी व गुन्हेगार तपासणी अधिक तीव्र करण्यात येणार आहे. निवडणूक शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी हजारो पोलीस, होमगार्ड व विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.







