Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad : नाशिकफाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदा प्रक्रियेला गती

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 29 March 2026, 11:03
Pimpri Chinchwad

photo- ppn

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड ते राजगुरूनगर खेड दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक, कामगार आणि उद्योजक त्रस्त असलेल्या भीषण वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी नियोजित नाशिक फाटा ते खेड या 30 किमी लांबीच्या 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. मार्च 2026 मध्ये या प्रकल्पासाठी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असून, या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला आता गती मिळाली आहे.

 

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत राबवण्यात येत असून, यासाठी सुमारे 7 हजार 827 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक निविदा प्रक्रियेत अदानी इंटरप्राईजेस लि., जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि. आणि प्रकाश एसफालटिंग अँड टोल हायवेज इंडिया लि. यांसारख्या देशातील आघाडीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या दर्जाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार महेश लांडगे यांचा सकारात्मक पाठपुरावा…

भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. विशेषतः भोसरी ते मोशी इंद्रायणी नदी दरम्यानच्या भू-संपादनातील अडचणी, एफएसआय/टीडीआरच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यातील अडथळे, तसेच निधीबाबतचे प्रश्न त्यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये…

या प्रकल्पांतर्गत सिंगल पिलरवर उभारण्यात येणारा 8 पदरी एलिव्हेटेड फ्लायओव्हर, विद्यमान महामार्गाचे 4/6 पदरी रुंदीकरण, एकूण 30 किमी लांबी, तसेच स्वतंत्र सर्व्हिस रोडची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण होणार आहे.

उद्योजक व नागरिकांना मोठा दिलासा…

हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि चाकणसारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांना खेडमार्गे वेगवान व सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सध्या पुणे–नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.

“नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा पिंपरी-चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील लाखो नागरिक, कामगार आणि उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून त्याच्या निविदा प्रक्रियेला मिळालेली गती समाधानकारक आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत आम्ही सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहोत.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27

10 वी नापास ते भोंदू ‘कॅप्टन’! वयाच्या 20 व्या वर्षीच सुरू झाले होते काळे कारनामे; अशोक खरात उर्फ लक्ष्मणचा जुना इतिहास समोर

Friday, 10 April 2026, 8:19

लेकाचा गळा दाबतांना पाझर फुटलं नाही! प्रियकर राम कजेवाडसाठी आई बसरीन शेखने केली पोटच्या गोळ्याची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Friday, 10 April 2026, 8:11

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39
Next Post
Throat Cancer

Throat Cancer : घसा दुखणं किंवा खोकला किरकोळ समजू नका; 'ही' लक्षणे 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकली, तर असू शकतो घशाचा कर्करोग!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.