Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंद्रायणी थडी : तीन दिवसांत साडेतीन कोटींहून अधिक उलाढाल; महिला बचत गटांमध्ये उत्साह:आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाची महाराष्ट्रभर चर्चा…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 January 2023, 13:10

पिंपरी : महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतूने सुरू केलेल्या ‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सवाला पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढला आहे. सुरुवातीच्या तीन दिवसांत तब्बल २० लाखहून अधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली असून, साडेतीन कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती समन्वयक संजय पटनी यांनी दिली.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर एकूण १७ एकर जागेत भव्य इंद्रायणी थडी- २०२३ महोत्सव सुरू झाला. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे महोत्सव झाला नाही. त्यामुळे यावर्षी महोत्सवाला प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

महोत्सवात एकूण १ हजार महिला बचतगटांनी विविध स्टॉल लावले आहेत. खाद्य पदार्थ, सौंदर्य प्रसाधने, जीवनावश्यक वस्तू, खेळणी, पुस्तक स्टॉल, घरगुती वापरासाठी विविध छोटी यंत्रे, पर्यावरण पुरक वस्तू, कपडे, परंपरीक पोषाख, यासह विविध १५० प्रकारच्या स्टॉलवर ग्राहकांनी खरेदीला पसंती दिली आहे.

खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉलवरील उलाढाल लक्षवेधी असून, बचत गटांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, सवलतीच्या दरामध्ये पिण्याचे पाणी अर्थात वॉटर बोटल्स उपलब्ध आहेत. आईस्क्रीम आणि कुल्फीसह ज्यूसच्या स्टॉलवर बच्चे कंपनींची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

 

‘सेलिब्रेटीं’मुळे महोत्सवाची राज्यभरात चर्चा…
‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामांकीत व्यक्ती उपस्थित होते.

भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह आजी-माजी खासदार, आमदार, राजकीय पदाधिकारी यांनी महोत्सवाला भेट देत आहेत. तसेच, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चर्चेत आलेला पैलवान सिकंदर शेख यांच्यासह कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.

दुसरीकडे, मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, स्वप्नील जोशी यांच्यासह प्रथमेश परब, मराठी सिनेतारखा, चला हवा येवू द्या, महाराष्ट्राचे विनोदवीर अशा विविध ‘सेलिब्रेटीं’मुळे इंद्रायणी थडी- २०२३ महोत्सवाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरात होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मदनवाडीत शेतीच्या वादातून तरुणावर कुऱ्हाड, कोयता, तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला! 7 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 15 October 2026, 13:34

येवला बाजार समितीत व्यापाऱ्यांचा वाद पेटला! कांद्याचे लिलाव ठप्प, शेतकऱ्यांची मोठी कोंडी..

Thursday, 15 October 2026, 13:09

मोबाईल युजर्ससाठी महत्वाची माहिती! 1 नोव्हेंबरपासून मोबाईल रिंगबाबत मोठा बदल ; निनावी कॉल करणाऱ्यांना चाप बसणार

Thursday, 15 October 2026, 12:54

दौंडमध्ये विनापरवाना गॅस सिलिंडर वाहतुकीचा पर्दाफाश; पिकअपसह 9 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

Thursday, 15 October 2026, 11:53

वरवंड येथे 18 लाखांची थकबाकी मागितली म्हणून बांधकाम साहित्य पुरवठादाराला बॅटने मारहाण

Thursday, 15 October 2026, 11:47

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा! “पाचही मारेकऱ्यांना ओळखतो, पण…” माजी महापौरांच्या पतीच्या कबुलीने तपासाला नवं वळण!

Thursday, 15 October 2026, 11:46
Next Post

काय सांगता! जेवायला दिले नाही म्हणून चक्क मित्राने चावा घेत तोडला मित्राचा कान; मार्केट यार्ड परिसरातील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp