Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कृत्रिम हात व पाय मिळाल्यानंतर ३१४ अपंगांच्या चेहऱ्यावर आनंद ;  जिद्द बाळगणाऱ्या अपंगांना आमदार लक्ष्मण जगताप व बंधू शंकर जगताप यांचा मदतीचा हात…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 29 July 2022, 19:11

पिंपरी – कुणाचा अपघातात, तर कुणाचा गंभीर आजारामुळे पाय किंवा हात निकामी झालेला. कुणी अपंगत्वच घेऊन जन्माला आलेलं. आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे अपंगत्वाची अवहेलना क्षणाक्षणाला झेलण्याचे नशीब वाट्यास आलेले. मात्र अशा अवस्थेतही जगण्याची, काही मिळवण्याची जिद्द या अपंगांमध्ये आहे. अशा जिद्द बाळगणाऱ्या अपंगांचा आधार बनून त्यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याचे सत्कर्म आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि त्यांचे बंधू भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी चालविले आहे. या सत्कर्मातूनच जगताप बंधूंनी शुक्रवारी (दि. २९) आयोजित शिबीरात ३१४ अपंगांच्या आयुष्यात आनंद फुलविला. त्यांना कृत्रिम हात व पायाचे (जयपूर फूट) तसेच व्हीलचेअर आणि ट्राय सायकलचे मोफत वाटप केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या पुढाकाराने चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने पिंपळेगुरवमध्ये हे शिबीर घेण्यात आले.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या शिबीराला शंकर जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंगोळकर, बाबा त्रिभुवन, माऊली जगताप, महेश जगताप, गोपाळ माळेकर, नवनाथ जांभुलकर, शिवाजी कदम, अमर आदियाल, विनोद तापकीर, योगेश चिंचवडे, शेखर चिंचवडे, संजय मराठे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे, निर्मला कुटे, उषा मुंढे, कोमल गौंडाळकर, राणी आदियाल, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

शिबीरात सहभागी अपंगांची तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करण्यात आली. कृत्रिम पाय किंवा बसवणे शक्य असेल त्यांच्या पायाचे मोजमाप करण्यात आले. त्यानुसार संबंधित अपंगांना जयपूर फूट बसवण्यात आले. शिबीरात ३१४ अपंगांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे सत्कर्म जगताप बंधूंनी केले. शिबीरात सहभागी १८६ अपंगांना जयफूर फूट मोफत बसवण्यात आले. त्याचप्रमाणे ८५ अपंगांना कॅलिपर्स, २८ अपंगांना व्हिलचेअर आणि १५ अपंगांना ट्राय सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.

 

यावेळी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, “अपंगत्व हे शरीराला आलेले असते. पण अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास भरला. त्यांना आधार दिला तर हे अपंगत्व मानसिक पातळीवर जात नाही. त्यासाठी समाजातील धडधाकट आणि आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्याच भवतालच्या अपंगांना आधार देण्याची गरज आहे. ही गरज ओळखून आमदार लक्ष्मणभाऊ जगताप गेल्या अनेक वर्षांपासून अपंगांना त्यांच्या पायावर उभे कारण्यासाठी जयपूर फूटचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहेत.

दरम्यान,  मधल्या काळात कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे या उपक्रमामध्ये खंड पडला होता. पण आता कोरोनाच्या संकटाला तोंड देऊन समाजजीवन पूर्वपदावर आलेले आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपंगांना जयपूर फूटचे मोफत वाटप करण्यासाठी शिबीर घेण्यात आले.

याबाबत बोलताना आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात  कि,  अपंगांसाठी अनेक शासकीय व आरोग्य योजना राबवल्या जातात. त्याचा लाभ घेण्यासाठी अपंगांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी  पिंपळेगुरव येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जगताप यांनी यावेळी केले आहे.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31

निमगाव केतकीतील दुचाकी चोरीचा पर्दाफाश; 1.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 14:24

MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचा पर्दाफाश! अटकेतले दोन्ही उमेदवार टॉपर; आतलं गूढ काय?

Sunday, 27 September 2026, 14:15

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! DA मध्ये 4% वाढ झाली तर पगारात किती रुपये वाढणार?जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Sunday, 27 September 2026, 13:23

उंदराने कुरतडली वीजेची वायर अन् घडला मोठा अनर्थ! पुण्यात पेटीला हात लावताच 50 वर्षीय महिलेचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 12:59

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’! मेसची दरवाढ अखेर रद्द; अनेकांना दिलासा

Sunday, 27 September 2026, 12:42
Next Post

शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी महायुती सरकार सदैव कटिबद्ध : माजी मंत्री चंद्रशेख बावनकुळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp