Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 February 2026, 16:47

पिंपरी-चिंचवड, ता. 21 : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय व विकासाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात “अजितसृष्टी” उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. याबाबत महापौर रवि लांडगे यांनी घोषणा केली.

 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले आहे. त्यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्यात यावी, अशी सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली होती. यावर महापौर आणि सभागृहातील पदाधिकारी- नगरसेवकांनी सर्वानुमते पाठिंबा दिला आणि प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबत आमदार लांडगे यांनी सभागृह आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

चिंचवड येथील डी-मार्टसमोरील सुमारे 33.86 एकर जागेत महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारली जात असून, त्यापैकी 8.65 एकर जागेवर मुख्य इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. भविष्यात संपूर्ण महापालिकेचे प्रशासकीय कामकाज याच भव्य इमारतीतून चालणार आहे. याच परिसरात अजितदादांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“अजितसृष्टी”मध्ये शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विकासाचा इतिहास, औद्योगिक प्रगती, नागरी सुविधा विस्तार आणि भविष्यातील विकास आराखड्याची ‘फ्युचर प्रिंट’ साकारण्यात येणार आहे. तसेच अजितदादांचा ब्राँझमधील पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून, जुन्या प्रशासकीय भवनातील सभागृहात त्यांचे तैलचित्र बसविण्यात येणार आहे. नव्या इमारतीतील प्रमुख सभागृहाला देखील अजितदादांचे नाव देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

दरम्यान, महापौर रवि लांडगे यांनी सभेत महत्त्वपूर्ण घोषणा करत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची संयुक्त पाहणी करण्यात यावी. यासोबतच त्या ठिकाणी “अजितसृष्टी” उभारण्याबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

“लोकनेते दिवंगत अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान बहुमूल्य आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिल्याबद्दल महापौर, पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक आभार मानतो. हा निर्णय पिंपरी-चिंचवडच्या विकासदृष्टीला आणि एकात्मतेला बळ देणारा ठरेल.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

नांदेडमध्ये गँगवॉरचा थरार! एकाच रात्रीत तिघांच्या हत्येने शहर हादरले; 5 जण गंभीर जखमी, नेमके काय घडले?

Saturday, 4 April 2026, 12:40
Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08
Next Post
Pune Crime

Pune Crime : सावित्रीबाईंच्या स्मारकाजवळ उभे राहून अपमान करणाऱ्या तरुणाला 'विश्रांतवाडी' पोलिसांनी दाखवला इंगा! त्या' व्हिडिओमुळे संतापाची लाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.