पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये (Ajit Pawar) मुंबईनंतर पुणे महापालिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि (Pune Mahapalika Election) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येथे थेट सामना रंगला आहे. गेल्या काही दिवसांपासून या (Pimpri-Chinchwad News) निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

प्रचाराचा शेवटचा रविवार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचारसभा घेतली. या सभेदरम्यान एक मजेशीर प्रसंग घडला. अजित पवार भाषण करत असताना एका कार्यकर्त्याने थेट “अजित दादा, I Love You” अशी हाक मारली. यावर अजित पवार यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर देत उपस्थितांना हसवले.
अजित पवार म्हणाले, “घड्याळाचं बटण दाब, ते I Love You बाजूला ठेव. घरी जाऊन बायकोला म्हण love u, love u… तेव्हा बायको म्हणेल आज जास्तच बिघडलाय.” त्यांच्या या मिश्किल उत्तरावर सभेत एकच हशा पिकला.
सभेत बोलताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाच्या योजना मांडल्या. पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले. विरोधक 75 वर्षांनंतर पीएमपीएल मोफत देण्याचे बोलत आहेत, मात्र कशाला 75 वयापर्यंत वाट पाहायची, आम्ही जन्मापासूनच मोफत सेवा देतोय, असा टोला त्यांनी लगावला.

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी युती केल्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, अनेक नागरिकांचे म्हणणे होते की आम्ही तुम्हालाही मानतो आणि मोठ्या साहेबांनाही मानतो, त्यामुळे युती केली. ही युती मतदारांना आवडली असून यामुळे मतांची विभागणी होणार नाही आणि शहराचा सर्वांगीण विकास होईल.
पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे दररोज साडे सात कोटी रुपये पेट्रोलवर वाया जात असल्याचे सांगत अजित पवार यांनी हेच पैसे मेट्रो प्रवासासाठी वापरण्याचा मोठा प्लॅन मांडला. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.






